आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना प्रकरण:अभिनेत्री कंगना रनोट आज घेऊ शकते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट, कार्यालय तोडफोडप्रकरणी करु शकते तक्रार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्रीने मुंबईची तुलना पीओकेशी केल्यानंतर हा वाद सुरू झाला.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिलांवर केलेल्या टीकेमुळे सध्या अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेत मोठा कलह सुरू आहे. अभिनेत्रीने मुंबईची तुलना पीओकेशी केल्यानंतर हा वाद सुरू झाला. यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. बीएमसीने तिचे कार्यालय अनधिकृत असल्याचे सांगून तोडफोड केली. यानंतर आता आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत ती कार्यालयावरील तोडफोडप्रकरणी तक्रार करु शकते.

कंगना आणि शिवसेनेतील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता या वादाला वेगळेच वळण लागत आहे. कंगना आज सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेऊ शकते. या भेटीमध्ये ती बीएमसीने तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाई विरोधात तक्रार करु शकते.

दरम्यान कंगना प्रकरणावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवसेनेवर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर बोलताना राज्यपाल म्हणाले होते की, माझं ह्याच्याशी काही देणंघेणं नाही मी कधी नाराज होतो असे मी म्हटलेले नाही. जे नाराज असतील त्यांनी ते छापले असेल असे सांगत राज्यपाल नाराज असलेल्या बातमीचे खंडन केले होते.