आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'डान्सिंग डॉल'वरुन पलटवार:'आपल्या सुनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान ती विद्या चव्हाण!' अमृता फडणवीसांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केले होते. या प्रकरणावरुन भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यामध्ये वाद सुरू आहे. आता हा वाद कोर्टापर्यंत गेला आहे. अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांचा उल्लेख डान्सिंग डॉल केला होता. त्यामुळे अमृता फडणवीस संतापल्याचे दिसतेय. विद्या चव्हाण म्हणाल्या होत्या की, 'रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. कमीत कमी रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाही. हे मला भाजपच्या लोकांना सांगावं वाटतं'. या विधानानंतर आता अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

अमृता फडणवीसांनी एकेरी भाषेत केला उल्लेख
अमृता फडणवीसांनी लिहिले की, 'आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादीची नेता विद्याहीन चव्हाण,आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!' असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे. त्यांनी विद्या चव्हाणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. हा अब्रुनुकसानीचा दावा असून या बाबतचा खुलासा कोर्टामध्येच करावा असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...