आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकारला धक्का:माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह सचिन वाझेचा ताबाही सीबीआयकडे, 100 कोटी वसुलीप्रकरणी करणार चौकशी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचा ताबा सीबीआयकडे देण्यास मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे.

100 कोटी वसुलीप्रकरणी देशमुख आणि वाझेसह एकूण चौघांचा ताबा मिळण्यासाठी सीबीआयने विशेष न्यायालयात विनंती अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे या सर्वांचा ताबा आता सीबीआयकडे देण्यात येणार आहे. देशमुख आणि वाझे यांच्यासह देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांचा ताबाही सीबीआयकडे देण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच न्यायालयाच्या परवानगीने सीबीआयने चौघांची कारागृहात जात चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसे सहकार्य न केल्यामुळे या चौघांचीही चौकशी करण्यासाठी त्यांचा ताबा देण्याची मागणी सीबीआयने केली होती. यासाठी सीबीआयने विशेष सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश डी. पी. शिंगाडे यांच्यासमोर या अर्जावर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयच्या या अर्जाला मंजुरी देत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

देशमुखांच्या अडचणीत वाढ
देशमुखांवर 100 कोटी वसुलीचा कथित आरोप झाल्यावर अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. या प्रकरणी सीबीआयने सर्वप्रथम देशमुख यांची चौकशी केली होती. नंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचा ताबा ईडीकडे देण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांचा ताबा पुर्णपणे सीबीआयकडे देण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सध्या कोणत्या कोठडीत आहेत आरोपी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या ईडीच्या अटकेनंतर आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेला अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हत्या प्रकरणी एटीएसने अटक केली असून तो सध्या तळोजा कारागृहात आहेत. अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे आर्थर रोड जेलमध्ये आहेत. या सर्व चारही आरोपींचा ताबा आता सीबीआयकडे गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...