आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपचे टीकास्त्र:महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी? शाळा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत आशिष शेलारांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई व ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तेथील महानगरपालिकांनी घेतला

कोरोना काळामुळे गेल्या अेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुंबई आणि ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपासून बंदच असणार आहे. यावरुन विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन भाजपने राज्य सरकारवर टीकास्त्र साधले आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत 'महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?' असा सवाल केला आहे.

आशिष शेलारांनी ट्विट केले की, 'शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाचीच आहे. पण शासन म्हणून काही करणार आहात की नाही. शिक्षक, संस्थाचालक, पालक संघटना, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन सरकार काही ठोस भूमिका घेणार की नाही? पालक, विद्यार्थी प्रचंड संभ्रमात आहेत. भयभीत आहेत'

पुढे शेलार म्हणाले की, 'परिक्षा घेण्यावरुन संभ्रम...परिक्षा घेतल्या त्यात पालक विद्यार्थ्यांना मनस्ताप.. अँडमिशवरुन गोंधळ... फी वाढीबाबत हतबलता...अभ्यासक्रमाबाबत ही प्रश्नचिन्ह.. शाळा सुरू करण्यात तर सावळागोंधळ... महाराष्ट्रात सरकार आहे कि छळछावणी?' असे सवाल करत शेलारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान मुंबई व ठाण्यातील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय तेथील महानगरपालिकांनी घेतला. मात्र त्यामुळे शाळा सुरू उघडण्याच्या निर्णयावरून गोंधळ निर्माण झाला होता. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सविस्तर माहिती देत स्थानिक प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले होते.

बातम्या आणखी आहेत...