आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाक् युद्ध:मी काय आहे हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या, चित्रा वाघ यांचे राष्ट्रवादीच्या नेत्याला प्रत्युत्तर; शेख म्हणतात -अडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही.

राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर रविवारी नगरमध्ये विखारी टीका केली होती. 'वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो' असे भाष्य शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर केले होते. आता याच टीकेला आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी काय आहे हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दात त्यांनी महेबूब शेख यांच्यावर पलटवार केला आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाल्या चित्रा वाघ
'वाघावर कोल्हे, कुत्रे भुंकत आहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे…काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा; कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही' असे म्हणत चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

कोण भुंकतंय हे सर्व महाराष्ट्र बघतोय
'अडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॅाग बाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर 5 जुन 2016 ला कार्यवाही झाली तेव्हा सरकार कुणाच होत ते सांगा? त्यांनी कोणत्या बुद्धीने कार्यवाही केली होती याच उत्तर द्या. आणि तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिले आहे कुणाला विचारायची आवश्यकता नाही. जस आम्ही म्हणतो की आमची नार्को करा तस म्हणा नवऱ्याची पण नार्को करा. कर नाही त्याला डर कश्याला ओ. आणि भुंकतय कोण हे महाराष्ट्र बघतोय आणि मी पण बाप बदलणाराचे बापाला पण भीत नाही' असे म्हणत शेख यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते महेबूब शेख
निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युतर देत असताना महेबूब शेख यांनी चित्रा वाघांवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे. वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. तसेच लाचखोर नवऱ्याची बायको अशी तुमची महाराष्ट्राला ओळख आहे' असेही लेख म्हणाले होते. याच टीकेला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले.

बातम्या आणखी आहेत...