आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएमसीची नोटीस:केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आता मुंबई महापालिकेचा दणका, बंगल्यात अनधिकृत बांधकामसंदर्भात बजावली नोटीस

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई महानगरपालिकेने नोटीस बाजवली आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार होती त्यासंदर्भात तपासणी करण्यासाठी मुंबई मनपाने ही नोटीस बजावली आहे.

नारायण राणेंच्या ‘अधीश’ या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेकडे आली होती. तारारोड येथील या बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत आहे अशी ती तक्रार आहे. या तक्रारीवरुनच आता राणेंच्या बंगल्याची तपासणी केली जाणार आहे. यासाठी पालिकेने नारायण राणेंना नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाचे पथक आज त्यांच्या बंगल्यामध्ये जाऊन तपासणी करणार असल्याचे नोटीशीत सांगण्यात आले आहे.

अंधेरी जुहू येथील तारा रोडवर बांधण्यात आलेल्या या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार आहे. यानुसार आज एक पथक बंगला आणि परिसराची पाहणी करून मोजमाप घेईल. दरम्यान पालिकेचे पथक तपासणीसाठी येईल त्यावेळी तुम्ही बंगल्याची कागदपत्र घेऊन तिथे हजर राहावे असेही नोटीशीत सांगण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी या संदर्भात तक्रार केली होती.

बातम्या आणखी आहेत...