आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्य परेशान हो सकता है पराजित नही!:'साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर…',न्यायालयाच्या निकालावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार

महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये छगन भुजबळांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांची दोषमुक्तता केली आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत. हे सर्व आरोप रद्द करण्याची मागणी भुजबळ यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. यावर आज मुंबई सत्र न्यायालयाने निर्णय दिला. या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ यासाठी तुरुंगामध्ये राहावे लागले. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितले आणि आज आम्हाला त्या प्रकरणामधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे' असे भुजबळांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की,'माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. विनाकारण मला तुरुंगात राहावे लाहले. आता गणेशोत्सच्याआधी आमच्यावरील संकट हे दूर झालेले आहे. सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…' असे भुजबळ म्हणाले.

साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए पर…
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज पाहायला मिळाला आहे. 'साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए… ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…' असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. पुढे ते म्हणाले की, 'तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. कोणी कितीही कटकारस्थान केले तरी थोटामोठ्यांच्या आशीर्वादामुळे आमच्यावचे विघ्न दूर झालेले आहे. पवारसाहेबांचे, जयंतराव-अजितदादांचे आभार... त्यांनी मला मंत्रिमंडळात घेतले, यासोबतच उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार...' असे भुजबळ म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...