आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाचा इशारा:नियम न पाळल्यास काही भागांमध्ये कडक लॉकडाउन लावण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा, एक-दोन दिवसात महत्त्वाचा निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात कोरोना लस घेतली.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहे. अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. दरम्यान औरंगाबादेतही अंशतः लॉकडाउन लावण्यात आले आहे. तसेच नागपुरातही 11 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आले. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. नियम न पाळल्यास काही भागांमध्ये लॉकाडाउन लावण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयात कोरोना लस घेतली. त्यांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, 'कोरोनाचा धोका पुन्हा वाढत आहे. यामुळे जे जे व्हॅक्सीन घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी मनात कोणतीही शंका न आणता लस घ्यावी. लसीकरण वेगाने वाढत आहे. मात्र तरीही काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आणि अंतर ठेवणे पाळावे लागेल. अजुनही परिस्थिती हाताबाहेरुन गेलेली नाही. यामुळे नियम पाळा.'

एक दोन दिवसात निर्णय घेत आहोत

मुख्यमंत्री म्हणाले की, 'जिथे आवश्यकता वाटेल तिथे कडक लॉकडाउन करावे लागेल. काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. याविषयी पुढच्या एक दोन दिवसांमध्ये निर्णय घेत आहोत' असे मोठे विधान मुख्यमंत्र्यांनी केले आहे. लसीकरण वेगाने होत असले तरीही नियम न पाळत असल्यामुळे लॉकडाउन लागण्याची शक्यता महाराष्ट्रात वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...