आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशभरासह राज्यभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान राज्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आहेत. सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यात आता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांचा तिढा अद्यापही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परमेश्वराला साकडं घातलं आहे.
कोकणात पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या गाऱ्हाणाच्या माध्यमातून उदय सामंतानी देवाला साकडं घातलं आहे. यामध्ये त्यांनी देशासह राज्याला सुरक्षित ठेव असं म्हटलं आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या परीक्षेता तिढा लवकरात लवकर सुटावा यासाठीही त्यांनी देवाला प्रार्थना केली आहे. भारताला आणि महाराष्ट्राला लवकरात लवकर कोरोनामुक्त करत असं साकडं ही त्यांनी परमेश्वराला घातलं आहे.
उदय सामंतांनी लिहिलंय की....
बा देवा महाराजा….
व्हय महाराजा….
ह्यो जो काय कोरोनाचो राक्षस जगात, देशात आणि माझ्या महाराष्ट्रात थैमान घालता हा त्येचो कायमचो काय तो बंदोबस्त कर रे महाराजा....
पॉझिटिव्ह इले त्येंका निगेटिव्ह कर, निगेटिव्ह इले त्येंका सुखरुप ठेव रे महाराजा…
माझ्या पोरांच्या परीक्षेचा तिडो लवकरात लवकर सुटू दि रे महाराजा....
चाकरमान्यांका गणपतीचा दर्शन होऊ दि रे महाराजा....
ह्येच्यात जर कोणी आडो इलो तर त्येका उभो कर, उभो इलो तर त्येका आडो कर रे महाराजा....
एकाचे एकवीस कर....पाचाचे पंचवीस कर… पण माझ्या भारताक, महाराष्ट्राक लवकरात लवकर कोरोना मुक्त कर महाराजा....
व्हय महाराजा....
माझं परमेश्वराकडे साकडं..... pic.twitter.com/J7hqz38Jlz
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020
राजभवनात कोरोना ..अमिताभजींना कोरोना .. अश्या सुरक्षित ठिकाणी कोरोना पोहचू शकला .. आत्ता तरी HRD आणि UGC ला पटेल का.. की परीक्षा घेणं म्हणजे माझ्या विध्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणं आहे.. आत्ता तरी भूषण पटवर्धन महाराष्ट्राची बाजू मांडतील का ???
— Uday Samant (@samant_uday) July 12, 2020
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.