आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांच्या विविध मागण्या या राज्य सरकारने अद्याप मान्य केलेल्या नाही. दरम्यान परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला होता. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परबांवर निशाणा साधला आहे.
याविषयी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, 'एसटी संपाविषयी मी जी माहिती घेतलेली आहे. त्यानुसार सर्व संघटना बाजूला सारून हा संप केला जात आहे. तुमच्या हातात जे राज्य दिलेले आहे ते लोकांसाठी दिलेले आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी तुम्हाला राज्य देण्यात आलेले नाही. त्यांच्याशी अरेरावीची, कायद्याची भाषा बोलली जाऊ नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्या, प्रश्न समजावून घ्या.' असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे चार-चार महिने पगार झालेले नाहीत. पगाराविनाच त्यांची दिवाळी गेलेली आहे. अशा वेळी तुम्ही अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अधिकृत बोलले पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले. यासोबतच खासगीकरण करण्याऐवजी एखादी मॅनेजमेंट कंपनी काढावी. इकडे मात्र, तुम्ही एक पाऊल देखील उचलत नाहीत. त्यांना वाऱ्यावर सोडून देऊन अरेरावाची भाषा करणे योग्य नाही. एक लाख कर्मचारी अंगावर आले, तर काय कराल? असा खोचक सवाल देखील राज ठाकरेंनी विचारला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.