आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळांना दिलासा:राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांना मोठा दिसाला मिळाला आहे. भुजबळांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामध्ये क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाच्या आरोपातून छगन भुजबळांची निर्देश मुक्तता झाली आहे. मुंबईतील सत्र न्यायालायाने आज हा निर्णय दिला. या प्रकरणातून छगन भुजबळांचे नाव वगळण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवास झाला होता.

यापूर्वी छगन भुजबळांनी या प्रकरणात आपले नाव गुन्ह्यातून वगळण्यात यावे अशी याचिका सत्र न्यायालयामध्ये दाखल केली होती. भुजबळांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने आज मोठा निर्णय देऊन भुजबळांना मुक्त केले आहे. या प्रकरणात यापूर्वी 5 जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावेळी ACB ने बेजबाबदारपणे गुन्हा नोंदवल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

काय आहे हा घोटाळा ?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते त्यावेळी जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाला असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयाने देखील भुजबळ यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते.

बातम्या आणखी आहेत...