आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीमध्ये बिघाडी?:पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; शिवसेना नेते अनंत गीतेंचा घणाघात

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्हीही पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. मात्र सरकार स्थापन केल्यापासून या तिन्हीही पक्षांमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आले आहे. महाविकास आघाडीतीली कुरबुरी सतत समोर येत असतात. दरम्यान आता शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गीतेंनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे.

शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाही
श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून झालेला आहे. शरद पवार आमचे नेते होऊच शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच आहेत.' असे अनंत गिते म्हणाले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला या कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून
अनंत गीते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर टीका करत म्हणाले की, काँग्रेस देखील काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील काँग्रेसच आहे. मात्र तरीही त्यांचे एकमेकांसोबत कधी जमत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? जर दोन काँग्रेस या एक होऊ शकत नाहीत, तर मग शिवसेना ही काँग्रेस विचारांची कधीच होऊ शकत नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म हा काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दुसरा कोणत्याही नेत्याला कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणत असेल, पण तो आमचा गुरु होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी तडजोड आहे' असे अनंत गीते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...