आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राऊतांचे राणेंवर टीकास्त्र:शिवसेना भवनावर दगड मारु असे मुळ भाजपचा माणूस कधीच बोलत नाही, हे बाहेरचे बाडगे बोलतात; संजय राऊतांचा राणेंवर निशाणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंबरेखालची टीका केली कर याद राखा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह विधान केले यानंतर शिवसेना आणि भाजप आमने सामने आल्याचे दिसत आहे. शिवसेनेने राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे तर राणे देखील वारंवार शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी नारायण राणेंवर विखारी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेना भवनावर दगड मारु हे बाहेरचे लोक बोलतात. मुळ भाजपचा माणूस असे कधीच बोलत नाहीत. कोणी तरी म्हणतेय की, मुख्यमंत्र्यांच्या कानफडात मारु हे बाहेरचे माणसं बोलतात. हे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधी मनगंटीवार हे कधीच बोलणार नाही. हे सर्व बाहेरुन आलेले बाडगे बोलतात.

कंबरेखालची टीका केली कर याद राखा
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना राणेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'सभ्य भाषेत टीका असेल तर ती नक्कीच स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही स्वीकारली जाईल. मात्र तुम्ही कंबरेखालची केली कर याद राखा. कंबरेखाली तुम्हीही आहात. तसेच बोलताना म्हणाले की, आमच्यासोबत भाषेची बरोबरी करु नका. आम्ही लिहणारे बोलणारे आहोत आणि सर्वकाही करणारे आहोत. असेही राऊत म्हणाले.

तुम्ही पंतप्रधानांच्या सूचना पाळत नाही
राऊतांनी जन आशीर्वाद यात्रेवरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'राजकारणात यात्रा काढायला हव्यात. पण यात्रा काढणाऱ्यांना यात्रेचा हेतू कळला नाही. सरकार काय काम करत हे लोकांना सांगण्यासाठी यात्रा काढा शी पंतप्रधानांची इच्छा आहे. यावेळी संसदेचे कामकाज चाललेले नाही. यामुळे अनेक गोष्टी लोकांपर्यंत गेल्या नाहीत. त्या लोकांना सांगा असे मोदींचे म्हणणे आहे. महाराष्ट्रात जा आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर चिखलफेक करा, असे आदेश पंतप्रधानांनी दिलेले नाही. म्हणजे तुम्ही पंतप्रधानांच्या सूचना पाळत नाहीतेय' असेही राऊत म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...