आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्यन ड्रग्ज प्रकरण:पैशांची मागणी झाल्याचा संजय राऊतांचा ट्विटरवरुन आरोप, पोलिसांनी या प्रकाराची स्वत:हून दखल घ्यावी असेही म्हणाले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरूख खानचा मुलगा आर्यन ड्रग्ज प्रकरणी आता मोठा खुलासा होत आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी पैशाची मागणी केली गेल्याची माहिती मिळत आहे. हा मोठा खुलासा केला आहे किरण गोसावी यांचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईल हे या प्रकरणातील पंच असून आर्यनला सोडण्यासाठी मध्यस्थांमार्फत 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एनसीबीवर आणि त्यांच्या या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह यापूर्वीच उपस्थित झाले होते. या माहितीनंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले की, एनसीबीकडून साक्षीदार असलेल्या व्यक्तीची एका कोऱ्या कागदावर सही घेतल्याचा प्रकार धक्कादायक आहे. तसेच आर्यनला सोडण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केल्याची देखील माहिती मिळत आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांचे हे म्हणणे खरे ठरत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकाराची स्वत:हून दखल घेतली पाहिजे, असे म्हणत त्यांनी दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्र्यांना ट्विट टॅग केले.

बातम्या आणखी आहेत...