आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर निर्णय झाला:महाराष्ट्रात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण; मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झाला निर्णय

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिले
  • लसींचा पुरवठा झालेला नसल्याने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 1 मे पासून शक्यता कमीच

राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केले जात आहे. आता राज्य सरकारने यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लसीकरणाविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य होते. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा करण्यात आली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी जवळपास 12 कोटी लसींची आवश्यकता भासेल. यासाठी राज्य सरकारकडून 6 हजार 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सध्या केवळ 45 वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण केले जातेय. तरीही राज्यात लसींचा तुटवडा भासत आहे. असे असाताना 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू करताना राज्य सरकारकडे मुबलक लसींचा साठा असणे गरजेचे असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...