आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा बंगल्यावर खलबतं:राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, वर्षा बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय राऊतांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

राज्याच्या राजकारणात महत्वाची घडामोडी घडत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री दाखल झाले आहेत. शरद पवारांपूर्वी परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहचले होते.

संजय राऊतांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तीन दिवसांमध्ये दोन वेळा भेट घेतली आहे.तीन दिवसांपूर्वी राऊतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यानंतर संजय राऊत सोमवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यानंतर तिथूनच संजय राऊत हे शरद पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओकला गेले होते. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. या सर्व घडामोडी पाहता महाविकास आघाडीमध्ये नेमकी चर्चा काय सुरू आहे, काय खलबतं सुरू आहे हे जाणून घ्यायची सर्वांनाच उत्सुकता आहे.

बातम्या आणखी आहेत...