आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:राज्यात एमपीएससीच्या जागांची भरती करणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - अजित पवार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी

राज्यात एमपीएससी पदांच्या रिक्त जागांचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान एमपीएससीच्या जागांची भरती करण्यावर राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यातील एमपीएससी रिक्त पदे भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही देण्यात आल्याची माहिती अजित पवारांनी दिली. तसेच त्यानंतर या जागांच्या जाहिराती जाहीर केल्या जातील.

यासोबतच देशातील प्रत्येक राज्यात सैनिक भरती होत असते. मात्र कोरोना संक्रमणामुळे महाराष्ट्रात ही सैनिक भरती मागील काळात झालेली नाही. राज्यात त्यामुळे ही सैनिक भरती संपूर्ण नियमांचे पालन करून घेण्यात यावी. तसेच राज्यात कुठेही सैनिक भरती असल्यास त्याची संधी मुला-मुलींना मिळण्यात यावी अशा सूचना राज्यसरकारने संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...