आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओबीसींच्या इम्पेरिकल डेटा कलेक्शनमध्ये सध्या अनेक त्रुटी आहेत. हा डेटा कोर्टात जमा झाला, तर ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशा इशारा विरोधी पक्षनेते वेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला. ते मुंबईत बोलत होते.
सध्याची पद्धत सदोष
फडणवीस म्हणाले, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सध्या इम्पेरिकल डेटा तयार करण्याची सुरू असलेली पद्धत सदोष आहे. त्याचा ओबीसींवर खूप मोठा परिणाम होणार आहे. अनेक नावे वेगवेगळ्या समाजामध्ये असतात. त्यामुळे तो व्यक्ती कुठल्या समाजाचा हे पाहावे लागते. सध्याच्या ओबीसींच्या इम्पेरिकल डेटामध्ये ओबीसींची संख्या ही मोठी प्रमाणात घटलेली दिसेल, माझ्याकडे आकडेवारी आली असून, मी ती योग्य वेळी सादर करेन. सरकार उशिरा जागे होते, तोपर्यंत ओबीसींचे नुकसान होते. मी सरकारला सांगू इच्छितो अनेक ओबीसींचे दुसऱ्या आरक्षणातही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
अन्यथा मैदानात उतरणार
फडणवीस म्हणाले की, मी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा केली. तेव्हा प्रत्येक जिल्ह्याचा सर्वे त्यांनी समजून घेतला. त्यातील अडचणी दूर केल्या. त्यामुळे तो सर्वे योग्य प्रकारे होऊ शकला. मात्र, राज्यात सरकारतर्फे असे कोणी लक्ष देत नाही. एकदा हा डेटा जमा झाला आणि कोर्टापुढे मांडला गेला, तर सरकारला त्यातून मागे येता येणार नाही. त्यामुळे ओबीसींचे या चुकीच्या डेटामुळे मोठे नुकसान होईल. सरकारने तत्काळ यासंदर्भात कारवाई करावी. जर त्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर मला माझ्याकडे असलेली माहिती घेऊन सरकारविरोधात मैदानात उतरावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
भुजबळांचे सातत्याने प्रयत्न
फडणवीस म्हणाले, छगन भुजबळांचे ओबीसी आरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्याबद्दल मला काही शंका नाही. मात्र, सरकारमध्ये या मंत्र्यांची एक क्षमता आहे. ते त्यापलीकडे जाऊ शकत नाहीत. हे मंत्री असले तरी अॅक्च्युअल डेटा कलेक्शन, मॉनेटरिंग याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या अडचणी सांगितल्या पाहिजेत आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यात हस्तक्षेप करायला पाहिजे. अन्यथा हा डेटा न्यायालयात सादर होऊन ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पंकजा मुंडेंची काळजी नको
फडणवीस म्हणाले, पंकजा ताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्यप्रदेशचा चार्ज आहे. त्या सातत्याने तिकडे जात असतात. तिथे निवडणूक असून, तिथला प्रभार त्या सांभाळतात. आम्ही सारेच एकमेकांच्या संपर्कात असतो. भाजप मोठा परिवार आहे. त्याची काळजी करू नका.
पाचवी जागा जिंकू
फडणवीस म्हणाले, सत्तारुढ पक्षांनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करावी, अशी आमची इच्छा होती. पंरतु ते बिनविरोध होऊ शकले नाहीत. आम्ही पाच जागा विधान परिषदेच्या लढवत आहोत. पाचवी जागा लढवणे हे सोपे नसून मात्र, मला विश्वास आहे की, पाचवी जागा आम्ही नक्कीच जिंकू.
सत्तारुढ गटांसोबत चर्चा
फडणवीस म्हणाले, सत्तारुढ गटांसोबत आपण चर्चा केली असून, काँग्रेसने एक उमेदवार मागे घ्यावा, परंतु काँग्रेसने आपला उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आम्ही देखील पाचवी जागा लढवत आहोत.
राऊतांचे विधान जोकरसारखे
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार पराभूत झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊतांनी विरोधकांवर टीका करत म्हटले होते की, काही दिवस ईडी आम्हाला भाडेतत्वावर द्या. फडणवीस देखील शिवसेनाला मतदान करतील. यावर देखील फडणवीसांनी भाष्य केले. ते म्हणाले की, संजय राऊत हे नेहमी जोकरसारखे विधान करतात. त्यामुळे त्याच्यावर काय उत्तर द्यायचे, असे म्हणत फडणवीसांनी उत्तर देण्यास नकार दिला.
म्हणून अर्ज मागे
फडणवीस म्हणाले, मला विश्वास आहे की विधान परिषदेत आमचा पाचवा उमेदवार निवडून येईल. आज आम्ही चर्चा केली असून, सहा ऐवजी पाचच जागा लढवण्याचे ठरवले आहे. म्हणून आम्ही सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.