आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. काही दिवसांपुर्वीच कल्याण-डोंबिवलीतील या रुग्णाला कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण झाली होती. संबंधित रुग्ण हा अभियंता असून त्याचे वय 33 इतके होते. कोरोना चाचणीत ओमायक्रॉन आढळल्यानंतर त्याला नगरपालिकेच्या एका खोलीत विलगीकरण करण्यात आले होते. हा रुग्ण दुबईच्या मार्गाने मुबंईत दक्षिण आफ्रिकेतून आला होता. त्यांची विमानतळावर कोरोना चाचणी केली असता, त्याला ओमायक्रॉनची लागण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णाने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता. त्याने कथितरित्या लसीकरण करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात तो असमर्थ ठरला, तो एका खाजगी मर्चंट नेव्ही जहाजावर काम करत होता. या वर्षी एप्रिलमध्ये तो देश सोडून विदेशात गेला होता. त्या वेळी लसीचा डोस केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्स यांनाच दिले जात होते.
केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, ओमायक्रॉन झालेल्या या रुग्णाला कल्याण-डोंबिवलीतील एका कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णाला बुधवारी संध्याकाळी सहा वाजता सुट्टी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बुधवारी त्याचा वाढदिवस होता, आणि याच दिवशी त्याच्या दोन्ही RT-PCR चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्याची प्रकृती सध्या चांगली असून, त्याला कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही.
राज्यात ओमायक्रॉनचे दहा रुग्ण
राज्यात ओमायक्रॉन या विषाणूचे आतापर्यंत दहा रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर विदेशी प्रवाशांसाठी काही निर्बंधे लावण्यात आली आहेत. आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला बूस्टर डोस आणि लसीकरणाच्या अंतराला कमी करण्याची मागणी केली आहे.
मुंबईनंतर पुण्यात पहिला कोरोना लसीचा डोस 100% नागरिकांनी घेतला आहे. या आकडेवारीला 2019 च्या मतदान यादीच्या आधारे मोजण्यात आले आहे. आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 1,13,53,633 आहे, पहिल्या डोससाठी लक्ष्यित लोकसंख्या ( 18 वर्षांवरील) 83,42,700 होती. तथापि, डोस देण्यात आलेल्या लोकांची वास्तविक संख्या 83,44,544 आहे. दुसरीकडे, दुसऱ्या डोसबाबत बोलायचे झाल्यास, जिल्ह्याने सध्या 65.7 टक्के उद्दिष्ट गाठले असून, एकूण 54,82,018 लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबईत शंभर टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. 73 टक्क्यांहून अधिक लोकांना दुसरा डोस मिळाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.