आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:शनिवारी रेकॉर्डब्रेक 5,318 नवीन रुग्णांची नोंद, राज्यात सार्वजनिक आणि खाजगी परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईच्या परळ पूर्व भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी अशी दवाखाने सुरू केली आहेत - Divya Marathi
मुंबईच्या परळ पूर्व भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी अशी दवाखाने सुरू केली आहेत
  • राज्यात रुग्ण बरे होण्याचा 52.25 टक्के, तर मृत्यू दर 4.64 टक्के आहे

राज्यात शनिवारी कोरोनाने अक्षरशः कहर केला. दिवसभरात रेकॉर्डब्रेक 5,318 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 167 रुग्णांचा मृत्यू झाला. यासोबतच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 59 हजार 133 झाला, तर मृतांचा आकडा 7,273 वर पोहचला आहे. सध्या 67,700 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून 84,285 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

बीएमसी गूगल फॉर्मवर मृतांची संख्या नोंदवणार,

बीएमसी मृत्यूचा डेटा अधिक अचूकपणे देण्यासाठी, 1 जुलै 2020 पासून, कोरोना व्हायरस गूगल फॉर्मवर मृत्यूची नोंद करण्याची प्रणाली सुरू करणार आहे. 1 जुलै 2020 पासून 48 तासांच्या आत त्याच्या रुग्णालयात मृत्यूची नोंद करण्याचे रुग्णालयाच्या नोडल अधिकाऱ्यास  निर्देश देण्यात आले आहेत. 

दोन महिन्यांत चेन स्नॅचिंगच्या केवळ दोन घटना घडल्या

कोरोना साथीच्या काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईत गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात चेन स्नॅचिंगच्या केवळ 2 घटना समोर आल्या आहेत. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात नोंदवलेल्या केसेसकडे नजर टाकल्यास एकूण 11895 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यापैकी 9415 गुन्हेगारी प्रकरणे केवळ लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन आहेत. 

यामुळे गुन्हेगारीत झाली घट

मुंबई पोलिस प्रवक्ते डीसीपी प्रणय अशोक यांच्या मते, लॉकडाउनमध्ये रस्त्यांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कारण लोक त्यांच्या घरातच राहिले. बाजारात गर्दी नव्हती. गुन्हेगारांना बाहेर येण्याची संधी मिळाली नाही. याशिवाय रस्त्यावर पोलिसांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. लॉकडाऊन कालावधीत शहरात199 चौक्या होत्या, याचा थेट परिणाम गुन्हेगारीच्या दरावर झाला.

सार्वजनिक आणि खाजगी परिवहन सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी

राज्यात लवकरच सार्वजनिक आणि खासगी परिवहन सेवा सुरू करण्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. यात रिक्षा आणि टॅक्सी चालक, खासगी बस आणि स्कूल बस चालक आणि ट्रक, टेम्पो आणि ट्रक चालक यांचा समूह आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली. परब म्हणाले की, लॉकडाउनमुळे अनेक वाहने तीन महिन्यांपासून धावली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर न धावणाऱ्या वाहनांवरील कर माफ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे. त्याशिवाय कर्जाचा हप्ता आणि बँकांचे विमा संरक्षण वाढवून देण्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...