आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महाराष्ट्र पोलिस:राज्यात 2500 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण, कोरोनामुळे आतापर्यंत 27 पोलिसांचा मृत्यू

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत लॉकडाउन दरम्यान लोकांची मदत करताना पोलिस...
  • संक्रमित झालेल्या 2500 पोलिसांपैकी 1500 पोलिस एकट्या मुंबईतील

राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असून त्याचा फटका पोलिसांना सर्वात वाइट बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. ताजा आकड्यानुसार, राज्यातील अडीच हजारांपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या व्हायरसची लागण झाली. ही आकडेवारी सोमवारी दुपारपर्यंतची आहे. एकूणच 2709 पोलिस कर्मचाऱ्यांना संक्रमण झाले. त्यातील 27 पोलिसांचा या व्हायरचे जीव घेतला. त्यातही गंभीर बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 93 नवीन कोरोनाग्रस्त पोलिस समोर आले आहेत. यात 8 वरिष्ठ अधिकारी आणि 85 पोलिस काँस्टेबल आहेत.

आठवडाभर रोज सरासरी 100 पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोनाग्रस्त पोलिसांबद्दल एक सकारात्मक बाब म्हणजे, यातील जवळपास 1000 पोलिस कर्मचारी बरे होऊन घरी पोहोचले आहेत. अर्थात यातील जवळपास 1500 पोलिसांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मृतांपैकी 16 पोलिस एकट्या मुंबईतील होते. तर उर्वरीत लोकांमध्ये तीन नाशिक ग्रामीण पोलिस, दोन पुणे पोलिस आणि एक सोलापूर येथून होते. यासोबतच, ठाणे येथील 2 आणि मुंबई एटीएसच्या 2 पोलिसांचा यात समावेश आहे. एकूणच पोलिसांना होणाऱ्या संक्रमणाची आकडेवारी पाहिल्यास एका आठवड्यातच सरासरी रोज 100 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे समोर आले.

मुंबईत 1500 पेक्षा अधिक संक्रमित

राज्यातील एकूण 2 लाख 1 पोलिस फोर्सचा एक चतुर्थांश भाग असलेल्या मुंबई पोलिसांतीस 1500 पेक्षा अधिक जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. ही आकडेवारी पोलिसांना झालेल्या एकूण कोरोनाच्या लागणची आहे. अर्थातच या 1500 पोलिसांपैकी जवळपास 800 जण बरे होऊन घरी देखील पोहोचले आहेत.

257 पोलिसांवर झाले हल्ले

एकीकडे कोरोनाशी लढताना पोलिस आपले जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. त्याच पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना देखील वेळोवेळी समोर आल्या. राज्यातील 257 पोलिसांवर लोकांनी हल्ले केले. त्यात 835 जणांना अटक देखील करण्यात आली. या हल्ल्यांमध्ये 86 पोलिस जखमी झाल्याची नोंद आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 24 तासांच्या आत कोरोनाग्रस्तांची संख्या 2487 ने वाढली आहे. संक्रमितांची संख्या वाढून आता 67 हजार 655 झाली आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 89 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच कोरोनामुळे जीव गेलेल्यांची राज्यातील संख्या 2 हजार 286 झाली आहे. आरोग्य विभागाच्या आकड्यांप्रमाणे, आतापर्यंत 29 हजार 329 लोक बरे होऊन घरी पोहोचले आहेत.

0