आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाझेची सूत्रे काथेंच्या हाती:मिलिंद काथे बनले मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख, सचिन वाझेंनंतर सोपवण्यात आली सूत्रे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मिलिंद मधुकर काठे हे गुन्हे शाखेच्या कक्ष 2 चे निरिक्षक होते.

उद्योगपती मुकेश अंबानी यांची स्फोटकांनी भरलेली कार सापडल्यानंतर वादात सापडलेल्या सचिन वाझेंचे निलंबन करण्यात आले होते. NIAने तपासादरम्यान सचिन वाझेला अटक केली होती. यानंतर आता मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची अर्थात क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रे मिलिंद काथे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. तसे आदेश काढण्यात आले आहेत.

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि नंतर मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिस गुन्हे शाखेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग वादात सापडला होता. यानंतर वाझे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना निलंबित केले होते.

सचिन वाझे यांचे निलंबन झाल्यानंतर त्याच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दरम्यान आता सचिन वाझेच्या जागी मिलिंद काथे यांना CIUच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद मधुकर काथे हे गुन्हे शाखेच्या कक्ष 2 चे निरिक्षक होते. त्यांना सध्या प्रभारी म्हणून नियुक्ती केले आहे.

बातम्या आणखी आहेत...