आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Police News | Coronavirus Infection In Police Department Updates: How Many CRPF BSF Jawan And Policemen Infected With Coronavirus In Maharashtra Delhi Tamil Nadu

कोरोनात पोलिस असुरक्षित:ड्युटीवर सोशल डिस्टन्सिंग शक्य नसल्यानेच 12 हजार पोलिसांना कोरोना, हल्ले देखील वाढले; संक्रमित पोलिसांपैकी 46% महाराष्ट्रात

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरीही पोलिसांवर हल्ले थांबेना, हल्ल्यांत सर्वाधिक जखमी पोलिसही महाराष्ट्रातूनच

देशभर कोरोनाच्या काळात लॉकडाउन यशस्वीरित्या लागू करण्यात पोलिसांची सर्वात महत्वाची भूमिका आहे. कोरोना काळातही ड्युटीवर तैनात असलेल्या जवानांनाच कोरोना संक्रमित शोधणे आणि त्यांच्या संपर्कातील लोकांची ट्रेसिंग करण्याचे काम सुद्धा करावे लागत आहे. तपास नाक्यांवर असो की रुग्णालयात किंवा क्वारंटाइन सेंटर आणि कंटेन्मेंट झोनमध्ये... प्रत्येक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून हे कोरोना योद्धे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. कोरोनात पोलिसांनी सामान्य लोकांच्या मनात घर केले आहे. परंतु, दिवस रात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी निभावणाऱ्या हजोरा पोलिसांनाच कोरोनोची लागण झाल्याचे दिसून येत आहे. इंडियन पोलिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, 12 जुलैपर्यंत देशभरातील 12,887 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. यातील 105 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे मुख्य कारण काय? याचे उत्तर देताना इंडियन पोलिस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि निवृत्त आयपीएस एन. रामाचंद्रन म्हणाले, पोलिसांची ड्युटीच अशी आहे की त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवता येत नाही. त्यांना वेळोवेळी लोकांची मदत करण्यासाठी किंवा ड्युटी करत असताना लोकांशी संपर्कातच राहावे लागते. यासोबतच, ड्युटी कंटेनमेंट झोनमध्ये किंवा रुग्णालयांमध्ये असल्यास संक्रमणाचा धोका वाढतो.

महाराष्ट्रात जवळपास 6 हजार पोलिसांना कोरोना, सर्वाधिक मृत्यू

देशात कोरोना व्हायरसची सर्वात वाइट परिस्थिती महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले प्रकरण 9 मार्च रोजी समोर आले होते. 12 जुलैपर्यंत येथे कोरोना संक्रमितांची संख्या 2.5 लाख झाली आहे. तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 10 पेक्षा अधिक झाला आहे. पोलिसांबद्दल बोलावयाचे झाल्यास देशात एकूण पोलिसांना झालेल्या कोरोना संक्रमणापैकी 43 टक्के संक्रमित महाराष्ट्रातून आहेत. या ठिकाणी 5,935 पोलिसांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यातील 74 जणांचा जीव गेला. एवढेच नव्हे, कर 600 पोलिसांना होम क्वारंटाइन करण्यात आले. महाराष्ट्रानंतर दुसरा क्रमांक दिल्लीचा आहे. या ठिकाणी 2800 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

तरीही पोलिसांवर हल्ले करत आहेत लोक

कोरोना काळात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांवर अनेक ठिकाणी हल्ल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत. काही ठिकाणी पोलिसांसोबत गैरवर्तन सुद्धा झाले आहेत. इंडियन पोलिस फाउंडेशनच्या आकडेवारीप्रमाणे, देशभर विविध ठिकाणी पोलसांवर हल्ले झाले. यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 86 पोलिस जखमी झाले आहेत.

निमलष्करी दलाचे 5 हजारपेक्षा अधिक जवान संक्रमित

कोरोना संक्रमण केवळ पोलिसच नव्हे, तर ड्युटीवर तैनात असलेल्या निमलष्करी दलाच्या जवानांना सुद्धा झाले आहे. इंडियन पोलिस फाउंडेशनच्या आकडेवारीनुसार, पॅरा-मिलिट्री फोर्सेसच्या 5,202 जवानांना कोरोनाची लागण झाली. यातील 27 जवान मृत्यूमुखी पावले आहेत. कोरोना संक्रमण सर्वात जास्त बीएसएफमध्ये झाले आहे. आतापर्यंत बीएसएफचे 1,659 जवान संक्रमित झाले. तर 5 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर सीआरपीएफचे 1,594 जवान संक्रमित असून त्यातील 9 जवानांचा मृत्यू झाला.