आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Political Crisis Live | Eknath Shinde Group At Guwahati Assam | Two Thirds Of Shiv Sena MLAs Split, So I Came With Shinde Bachchu Kadu

भाजपसोबत जायचे की नाही बैठकीत ठरवू:शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार फुटले त्यामुळे मी शिंदेंसोबत आलो- बच्चू कडू

मुंबई / गुवाहाटी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या आम्ही गुवाहाटीत आहोत. आज आमच्या सर्व आमदारांची मीटिंग होणार असून, रात्री पर्यंत काय होणार हे समजेल. आमच्यासोबत 38-39 शिवसेनेचे आमदार आहेत. गट स्थापन करण्याची तयारी सुरुवात झाली असून, सेनेचे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने एकनाथ शिंदेसोबत आलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आम्ही चर्चा केली आहे. काँग्रेसचे देखील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीतले मंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे.

पुढे बच्चू कडू म्हणाले की, भाजपचे संजय कुटे आमच्यासोबत आहेत. आमच्या दोन आमदारांनी सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता शिवसेनेचे 75 टक्के आमदार बाजूला आल्यामुळे मी देखील त्यांच्यासोबत आलो. माझी मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही व्यक्तिगत नाराजी नाही. जी काही नाराजी आहे ती निधी वाटपाबाबत झाली आहे. निधी वाटपाबाबत शिवसेनेच्या आमदारांना दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नाराजी आहे.

मुख्यमंत्री नाराज झालेत

मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. विधान परिषद , राज्यसभेत आम्ही सेनेला मतदान केले. त्यानंतर ही सुरुवात झाली. मुख्यमंत्री ठाकरे सोबत चर्चा झाली. झालेल्या सर्व प्रकारामुळे ते नाराज आहेत. शिंदेंसोबत आलेले सर्व आमदार खुश असून, स्वखुशीने ते आले आहेत, असे बच्चू कडू म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...