आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील ऐतिहासिक राजकीय उलथापालथीदरम्यान विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी या घडामोडींवर एक सूचक ट्वीट केले आहे.
आपल्या ट्वीटमध्ये आंबेडकरांनी प्रश्न विचारला आहे की, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे का?
आंबेडकरांनी केलेल्या या ट्विटवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना म्हटले की, भाजपने अशी कोणतीही अट घातलेली नाही. दरम्यान, एकनाथ शिंदे यांना आणखी काही आमदार आणि खासदारांचे समर्थन मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे जवळपास 8 ते 9 खासदार शिंदेंच्या संपर्कात आहेत. याशिवाय आणखी काही सेना आमदारांनीही गुवाहाटीच्या दिशेने कूच केल्याची माहिती समोर आली आहे.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाइव्ह येऊन बंडखोर आमदारांना परत येण्याची भावनिक साद घातली. एवढेच नव्हे तर आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. तथापि, आता शिंदे गट काय निर्णय घेतो, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
एका वृत्त वाहिनीशी बाेलताना आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेचे बंडखाेर नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपअध्यक्ष किंवा राज्यपाल यांना त्यांचा वेगळा गट असल्याबाबतचे लेखी पत्र द्यावे लागेल. त्यांनी संबंधित पत्र राज्यपाल यांना न देता विधानसभा उपाध्यक्ष यांना दिले तर त्यांच्या समाेर वेगळया गटातील प्रत्येक आमदारास प्रत्यक्ष बाेलवून त्यांची सही खरेच आहे का? ही बाब तपासून पाहावी लागेल. त्यानंतरच पक्षांतर बंदी कायदाबाबत वेगळा गटाचे अस्तित्व मान्य हाेऊ शकेल. एकनाथ शिंदे आगामी काळातही त्यांचा गट एकत्रित ठेवू शकतात का? हे पाहवे लागणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी लाबं
उद्धव ठाकरे यांनी काल केलेले वक्तव्य महत्वाचे असून शिंदे साेबत गेलेल्या एखाद्या आमदाराने मला येऊन सांगितले की, राजीनामा द्या तर मी देऊन टाकेल. परंतु त्यांच्यापैकी काेणी परत येऊ शकत नाही. शिंदे गुवाहाटीत बसून सांगतात की, 2/3 पेक्षा जास्त संख्या आमच्याकडे आहे. शिंदे ही बाब किती दिवस लांबवतात हे सांगता येणार नाही परंतु राज्यपाल जाेपर्यंत काेराेनातून बरे हाेत नाही ताेपर्यंत हे सुरू राहिल. मात्र, ही बाब एकनाथ शिंदे यांच्या फायद्याची नाही. भाजपने अद्याप त्यांचे पत्ते उघडलेले नसून राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काँग्रेस पक्ष अद्याप या घडमाेडीपासून काही अंतर ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.