आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले. राज्यपालांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
मुंबईच्या उभारणीत सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र यात सर्वांत मोठा वाटा आहे तो मराठी माणसाचा, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. एखाद्या समाजाने मुंबईतील पैसा काढला तर मुंबईत पैसा राहणार नाही असे बोलणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नसल्याने हे वक्तव्य केले असावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. तर राज्यपाल घटनात्मक पद आहे, त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी, अशी मागणी दीपक केसरकरांनी केली आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठे योगदान आहे. असेही त्यांनही यावेळी सांगितले.
राज्यपाल कोश्यारी काय म्हणाले?
गुजराती आणि राजस्थानी जर मुंबईतून निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केले आहे. अंधेंरी पश्चिममध्ये स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठे योगदान आहे. असेही शुक्रवारी संध्याकाळी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.