आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्ष LIVE:बंडखोरांनी सुरू केली सरकार स्थापन करण्याची कवायत; शिंदेंनी इंदूरमार्गे वडोदरा गाठत घेतली फडणवीसांची भेट

मुंबई/ गुवाहाटी2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील राजकारण आता एका रोमहर्षक वळणावर पोहोचले आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या बंडखोर गटाने आता भाजपच्या मदतीने प्रत्यक्ष सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी शिंदेंनी स्वतः शुक्रवारी रात्री इंदूरमार्गे गुजरातच्या वडोदऱ्याला जात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

सूत्रांच्या माहितीनुसार, वडोदऱ्यात फडणवीसांची भेट घेतल्यानंतर शिंदे रातोरात गुवाहाटीला परतले. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या गटाने आपल्याकडे 38 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. या गटावर पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

बंडखोरांच्या कार्यालयांवर शिवसैनिकांचे हल्ले

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या ​सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तोडफोड केली. शुक्रवारी कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.

शिंदेच्या किल्ल्यात संचारबंदी

ठाण्यात कायदा व सुव्यवस्था कडेकोट करण्यात आली असून, परिसरात शांतता राखण्यासाठी विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील हिंसाचार आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता पुढील 5 दिवस 30 जूनपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात लाठ्या, शस्त्रे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घोषणाबाजी किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही परवानगी नाही.

लाइव्ह अपडेट्स:

 • शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळ्यात गुवाहाटीमध्ये पत्रकार परिषद.
 • गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारी पक्षप्रमुखांना, शिवसेनेच्या कार्यकारिणीत ठराव मंजूर.
 • उल्हासनगरमध्ये श्रीांत शिंदेंच्या ऑफिसवर दगडफेक
 • बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटीत बैठक सुरू.
 • शिवसेनेतले बंडखोरी नाट्य आणि आमदारांच्या कार्यावरील हल्ले पाहता मुंबईत कलम 144 लागू.
 • कायदेशीर मान्यतेशिवाय शिंदेंनी कोणत्याही नावाने गट स्थापला तरी त्याला अर्थ नाही, अशोक चव्हाण यांची टीका . वाचा सविस्तर बातमी
 • शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक सुरू; बंडखोर आमदारांना निलंबनाची नोटीस.
 • बंडखोर एकनाथ शिंदेंकडून आज गटाच्या नावाची घोषणा केली. शिवसेना बाळासाहेब ठाकरे असे नामकरण करण्यात आले आहे.
 • देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांची भेट. आठवले म्हणाले - 'शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू असून आम्ही "वेट अँड वॉच"च्या भूमिकेत...वाचा सविस्तर बातमी
 • महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांशी बोलताना केंद्र सरकार कडे केली आहे. राज्यातली परिस्थिती पाहता हा निर्णय घ्यावा, असे साकडे त्यांनी घातले आहे.
 • बंडखोर एकनाथ शिंदे यांची आज दुपारी आमदारांसोबत बैठक. बैठकीत प्रवक्त्याच्या नावाची करणार घोषणा. दीपक केसरकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता.
 • एकनाथ शिंदेंचा दावा गृहमंत्र्यांनी ठरवला खोटा, कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश दिले नसल्याचे दिले स्पष्टीकरण.
 • बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्र पोलिस आणि गृहमंत्र्यांना पत्र. बंडखोर आमदारांच्या कुटुंबाचे पोलिस संरक्षण काढून घेण्यास तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वाचा सविस्तर बातमी
 • आमदारांच्या कुटुंबाला काही झाले, तर त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय रावत आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे जबाबदार.
 • पुण्यात शिवसैनिकांनी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. वाचा सविस्तर बातमी
 • आजच्या बैठकीत शिंदेची शिवसेना नेतेपदावरुन हकालपट्टी होण्याची शक्यता
 • शिंदे गट राज्यपालांना पत्र देण्याच्या तयारीत
 • गुवाहटीत आज दुपारी दोन वाजता पुन्हा बंडखोर आमदारांची बैठक
 • भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक
 • शिवसेनेत आजही बैठकीचे सत्र कायम; आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 'मातोश्री'वर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते राज्यातल्या राजकीय घडामोडीवर करणार चर्चा करणार असल्याचे समजते.
 • महाराष्ट्रातल्या सत्तासंग्रामाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला. त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तोडफोड करणारे लोक शिवसेनेचे असल्याचा आरोप बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी केला आहे. तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.
 • संकटकाळात पक्षाने साधी विचारपूसही केली नाही. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला तोंड देताना आणि संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही, याचे मनात शल्य आहे. मनाला अजूनही यातना होतायत. शिवसेना सोडून यशवंत जाधवांनी कधीही दुसरा विचार केला नाही. या शिवसैनिकांनी आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. यशवंत जाधव कधीही बईमानी करणार नाहीत. त्यामागे काही तरी कारण आहे. त्याचं कारणही तुम्ही समजून घ्यायला हवं, अशी प्रतिक्रिया बंडखोर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी दिलीय.
 • राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असून, महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी आखल्या जाणाऱ्या पुढच्या रणनितीबाबत चर्चा करणार आहे. मविआ सरकार बहुमतात आहे. सर्वजण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे आहेत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ते मुंबईत बोलत होते.
 • ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. उद्धव यांनी शिवसेना भवनातील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ऑनलाइन मार्गदर्शन केले. जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावं. मी जिद्द सोडली नाही. हे सारे भाजपने केले, त्यांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. येथे वाचा पूर्ण बातमी
 • शिवसेनाभवनात एक बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आदित्य म्हणाले, कुटुंबप्रमुखाला धोका देता याचे वाईट वाटते. धोका मित्रपक्षांनी दिला असता, तर समजू शकलो असतो. राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
 • शिंदेसेनेच्या आकड्यात वाढ. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार दिलीप लांडे पोहचले. लांडे यांचे उत्साहात स्वागत. येथे वाचा पूर्ण बातमी
 • शिवसेना भवनातील बैठकीला मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार गैरहजर. आदित्य ठाकरे करणार मार्गदर्शन.
 • मुंबईत देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची खलबते सुरू आहेत. पक्षाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असून, आगामी रणनीतीवर चर्चा सुरू असल्याचे समजते.
 • सध्याची परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून अंधाधुंद निर्णय घेणे सुरू. या प्रकारात राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. कोश्यारी यांच्याकडे भाजपची पत्रातून मागणी. येथे वाचा पूर्ण बातमी
 • शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी अजय चौधरी यांना मान्यता दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...