आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची बातमी:दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतीच याविषयी शालेय शिक्षण विभाग आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी ट्वीटरवर यासंदर्भात माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

याविषयी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, 'गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. आधीच अभ्यासाचा ताण आणि त्यामध्ये रुग्णांची सतत वाढणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीमध्ये परीक्षा कशा घ्याव्यात हा महत्वाचा प्रश्न होता. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य हे आमच्यासाठी प्राथमिकता आहे. दरम्यान आता या परीक्षा पुढे किती तारखेला घेण्यात याव्या याविषयी अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होतील', असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

आजच्या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्याविषयी चर्चा करण्यात आली. कोरोना रुग्णसंख्या पाहता परीक्षा पुढे ढकलाव्या असे मत बैठकीमध्ये मांडण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...