आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात पावसामुळे 49 ठार:रायगड आणि सातारामध्ये झालेल्या भूस्खलनात 44 लोकांचा मृत्यू, 90 लोक बेपत्ता; साताऱ्यामधून 221 तर कोल्हापुरात 485 लोकांची सुटका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात एनडीआरएफ पथकाव्दारे बचाव कार्य जोरात सुरु आहे

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पावसामुळे आतापर्यंत 49 लोकांचा मृत्यू झाला असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यातील तळई गावात एक मोठी घटना घडली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे तळई गावातील काही घरांवर डोंगराचा ढिगारा कोसळला आहे. ज्यामध्ये 35 पेक्षा जास्त घरे दबली गेली आहे. या घटनेत आतापर्यंत 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मदत व बचावकार्य सुरु आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहे. आतापर्यंत 32 लोकांचे मृतदेह काढण्यात आले असून यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जखमी लोकांना जवळील उपचार केंद्रात दाखल केले जात आहे.

साताऱ्यात भूस्खलनात 8 लोकांचा मृत्यू
रागयड पाठोपाठ साताऱ्यातील आंबेघर गावातदेखील भूस्खलन झाले आहे. यामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त लोक मलाब्याखाली दबले गेले आहेत. रायगड आणि साताऱ्यातील भूस्खलनात 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 90 पेक्षा जास्त लोक बेपत्ता आहे.

कोल्हापुरात बचाव कार्य जोरात सुरु आहे.
कोल्हापुरात बचाव कार्य जोरात सुरु आहे.

साताऱ्यात एनडीआरएफकडून 221 लोकांची सुटका
सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक लोक अडचणीत सापडले आहे. लोकांची सुखरुप सुटका करण्यासाठी एनडीआरएफची टीम सतत बचावकार्य करत आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे यात अडचण येत आहे. साताऱ्यातील मिरगावमध्ये एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 221 लोकांची सुटका केली आहे. यामध्ये 27 पुरुष असून 121 महिला आणि 28 लहान मुलांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील चिखली गावात बचाव करताना एनडीआरएफचे पथक...
कोल्हापुरातील चिखली गावात बचाव करताना एनडीआरएफचे पथक...

कोल्हापुरात 485 लोकांची सुटका करण्यात आली
एनडीआरएफचे अनेक पथके सध्या बचावकार्यात व्यस्थ आहेत. कोल्हापुरात एनडीआरएफच्या पथकाने आतापर्यंत 485 लोकांची सुखरुपपणे सुटका केली आहे. यामध्ये 320 पुरुष, 130 महिला आणि 35 लहान मुलांचा समावेश आहे.

मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील बहूतांश भागात पाणी साचले.
मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील बहूतांश भागात पाणी साचले.

मुंबईत इमारत कोसळून 5 जणांचा मृत्यू
मुंबईतदेखील सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे शहरातील प्रमुख भागात पाणीच पाणी साचले आहे. शुक्रवारी मुंबईत इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक एकाच परिवारातील असून यामध्ये 6 लोक गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मुंबईतील राजवाडी औमर सायन रुग्णालयात भरती करयात आले आहे.

महाडमध्ये पूरात अडकलेल्या लोकांना बचाव करताना एनडीआरएफची टीम.
महाडमध्ये पूरात अडकलेल्या लोकांना बचाव करताना एनडीआरएफची टीम.

नद्यांचे पाणी शहरे आणि खेड्यांमध्ये शिरले आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस कोकण, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भाग पाण्यात बुडाले आहेत. कोकण विभागात पावसाशी निगडित घटनांमध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 700 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

हे चित्र आंबोली घाटात दरडी कोसळण्याचे आहे.
हे चित्र आंबोली घाटात दरडी कोसळण्याचे आहे.

रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तळई गावात गुरुवारी दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळाली असून एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली आहे. भोर-महाड मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने वरंधा घाट बंद करण्यात आला.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रत्नागिरी जिल्ह्यात जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपासून दोन मीटर जास्त आणि वशिष्ठ नदी जवळपास एक मीटर उंचीवरुन वाहत आहे. काजळी, कोडावली, शास्त्री आणि बावंडी नद्यांनीही धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, गढी आणि उल्हास नद्यादेखील धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत.

भीमाशंकरचा निम्मा भाग पाण्यात बुडाला
12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमशंकर ज्योतिर्लिंगमध्ये आणि परिसरात पूरसदृश परिस्थिती आहे. मंदिराच्या पुजार्‍यांनी शुक्रवारी महादेवचीआरती अर्ध्या पाण्यात उतरून केली. हे ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यातील खेड येथे स्थित आहे.

पन्हाळगडावर जाणारा एकमेव रस्ता दरड कोसळल्याने बंद, जकात नाका परिसरात अजूनही दरडी कोसळणे सुरूच आहे.

बातम्या आणखी आहेत...