आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाचे थैमान:कोकण भागात पावसाचा हाहाकार, पूर परिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नद्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने सदर ठिकाणी एन. डी. आर. एफ. कोस्ट गार्ड, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. तसेच रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीच्या वर वाहत असल्याने सदर ठिकाणी एन. डी. आर. एफ. कोस्ट गार्ड, नौदल तसेच सैन्य दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एन.डी.आर.एफ च्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे अशी माहिती ही आपत्ती विभागाकडून देण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने येथे हाहाकार माजला आहे. नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...