आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 6 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस:​​​​​​​रत्नागिरीतील चिपळून पाण्याखाली; रस्त्यांवर 15 फूट पाणी भरले, 6 हजार रेल्वेमध्ये तर 2 लाखांपेक्षा जास्त लोक घरांमध्ये अडकले

रत्नागिरी/रायगड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर थांबवण्यात आल्या आहेत

कोरोना महामारीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करणारा महाराष्ट्र आता पावसाळ्याच्या दुहेरी त्रासामुळे त्रस्त आहे. राज्यातील कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. यासह यवतमाळ, ठाणे, कोल्हापूर, अकोला आणि मुंबईतही मुसळधार पाऊस झाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथील नद्या व धरणांच्या ओव्हर फ्लोमुळे चिपळूण शहर पुराच्या पाण्यात बुडाले आहे. येथे शहर आणि रस्त्यांवर 15 ते 20 फूटांपर्यंत पाणी भरले आहे. रेल्वे रुळांपासून, बसस्थानक, घरे आणि रस्ते पाण्याने भरलेले आहेत.

चिपळूण बसस्थानकात उभ्या असलेल्या बसेसचा फक्त वरचा भाग दिसतो. घरातील साहित्य पाण्यावर तरंगत आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांनी जलसमाधी घेतली आहे. त्याच वेळी या मार्गावरुन जाणाऱ्या ट्रेनमध्ये 6 हजाराहून अधिक लोक पाण्यात अडकले आहेत. त्याचवेळी 2 लाखाहून अधिक लोक त्यांच्या घरात अडकले आहेत.

रत्नागिरी व रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग पाणी भरल्याने बंद झाला, तर इगतपुरीच्या कसारा घाटात मुसळधार पावसाने दरड कोसळली तर काही ठिकाणी रेल्वे रुळ वाहून गेले. परिणामी मध्य रेल्वेवरील टिटवाळा ते इगतपुरी आणि अंबरनाथ ते लोणावळा अशी रेल्वेगाडी काही तास बंद राहिली.

स्थानिक बाजार आणि बसस्थानकही पाण्यात बुडाले
स्थानिक बाजारपेठ, बसस्थानक आणि चिपळूणमधील रेल्वे स्थानक सर्वच पाण्याखाली गेले आहेत. खेड आणि महाड येथे भीषण परिस्थिती आहे येथे बचावकार्य चालू आहे. खेडमधील जगबुडी नदीनेदेखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. आजूबाजूच्या भागात पूरचा इशारा देण्यात आला आहे.

अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावर थांबवण्यात आल्या आहेत
कोकण रेल्वे मार्गावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. यापैकी बऱ्याच रद्द केल्या आहेत किंवा त्यांची वेळ बदलली गेली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोकण रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांवरील गाड्यांमध्ये सुमारे 6,000 प्रवासी अडकले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने चांगलेच फटकारले आहे. अशा परिस्थितीत सुरक्षेमुळे त्यांना थांबवण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की मुंबईत मुसळधार पावसामुळे 33 गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. 51 शॉर्ट टर्मिनेट केल्या आहेत. तर 48 रद्द केल्या आहेत. 14 गाड्यांचे रूटिंग कमी करण्यात आले आहे.

यवतमाळ, भिवडी आणि डोंबिवली पश्चिममध्ये परिणाम
यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसानंतर सहस्त्रकुंड धबधब्याच्या पाण्याची पातळीही सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाण्यातील भिवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबईजवळील डोंबिवली पश्चिममधील अनेक झोपडपट्ट्याही पुरामुळे नष्ट झाल्या आहेत. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी स्थानिक लोकांना बोटी वापरताना दिसले. काल रात्री उशिरापासूनच पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

मुंबई-गोवा महामार्गही बंद
मुंबईपासून सुमारे 240 कि.मी. अंतरावर असलेले चिपळूण हे राज्यातील सर्वाधिक प्रभावित शहर आहे. येथे बचावकार्य सुरू आहे. बचाव दल अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेत आहे. भीषण पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गही बंद करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा वशिष्ठ नदीकाठी धरण वाहून गेल्यानंतर पाणी शहराच्या दिशेने आले असल्याचे बोलले जात आहे.

अकोल्यात 2 हजार घरे बुडाली
अकोल्यात अवघ्या तीन ते चार तासांच्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्व नदी नाले तुंबले आहेत. जवळपास 2000 घरे पाण्याखाली गेली. अकोल्याच्या फुलेश्वर, शास्त्री नगर आणि नूतन नगरमध्ये 4 ते 5 फूट पाणी लोकांच्या घरात शिरले. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची उभी पिके उध्वस्त झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...