आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज:राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्यसेवकांना दिली जाणार लस; आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणासाठी कोल्ड चेन सुद्धा तयार, काही कमतरता असेल तर ती दूर करु : राजेश टोपे

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रही लसीकरणासाठी सज्ज झाला असून राज्यात जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

काय म्हणाले राजेश टोपे?

“राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून दिल्यानंतर लगेचच आम्ही लसीकरणाला सुरुवात करु. यासाठी कोल्ड चेन सुद्धा तयार आहे. काही कमतरता असेल तर ती दूर करु,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

देशभरात पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना मिळणार लस

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. सरकारने शनिवारी याची घोषणा केली. सुरुवातीला ही लस आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन कामगारांना दिली जाईल, ज्यांची संख्या 3 कोटी आहे. दुसर्‍या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्‍या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लस दिली जाईल. दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांना लस दिली जाईल.

लोहरी, मकरसंक्रांत, पोंगल आणि माघ बिहू यासारखे सण लक्षात घेऊन 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...