आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Maharashtra Safe Zone For World Cup Matches; Pak Team's Participation In The Political Turmoil!; News And Live Updates

टी-20 विश्वचषक:वर्ल्डकप सामन्यांसाठी महाराष्ट्र सेफ झोन; पाक टीमच्या सहभागाने राजकीय गदारोळाचा धसका!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीसीसीआयकडून महाराष्ट्रात विश्वचषक सामने आयोजनाची चर्चा; आयपीएल युएईमध्येच होणार
  • टी-20 वर्ल्डकपबाबत निर्णय जुलैत घेण्याचे बीसीसीअायचे आयसीसीला साकडे

काेराेनाचा धाेका वेगाने वाढत असल्याने देशातील परिस्थिती गंभीर हाेत अाहे. अशा महामारीमुळे भारतामधील टी-२० विश्वचषकाचे अायाेजन अडचणीत सापडले. मात्र, अशा संकटातही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला महाराष्ट्र हे विश्वचषक अायाेजनासाठी सेफ झाेन असल्याचे वाटते. त्यामुळे मुंबई अाणि पुण्यातील मैदानावर या विश्वचषक सामन्यांच्या अायाेजनाबाबत चर्चा केली जात अाहे. या विश्वचषकात पाकिस्तान टीम सहभागी हाेत अाहे. मात्र,पाकचा दाैरा हा राजकीय विषय हाेईल. त्यामुळे मात्र, याच सकारात्मक परिस्थितीमध्ये पाक टीमच्या सहभागाने महाराष्ट्रामध्ये राजकीय गदाराेळाचाही माेठा धसका बीसीसीआयला अाहे.

ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊ‌न बीसीसीआयने अाता सावध पवित्रा घेतला. यातून बीसीसीआयने या स्पर्धेच्या अायाेजनाबाबत आगामी जुलै महिन्यात निर्णय घ्यावा, असे साकडे घातले अाहे. विश्वचषक अाणि आयपीएल अायाेजनाबाबाबतच्या चर्चेसाठी बीसीसीआयची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. या बैठकीदरम्यान माेठी चर्चा झाली. यात विश्वचषक अायाेजनावर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयने एक महिन्याचा अवधी आयसीसीकडे मागितला अाहे. याच मागण्यासाठी बीसीसीआय अाता आयसीसीच्या बैठकीत सहभागी हाेणार अाहे. येत्या १ जून राेजी दुबईमध्ये आयसीसीची बैठक हाेणार अाहे.

अध्यक्ष गांगुली, जय शहा सोमवारी दुबईला रवाना
येत्या १ जून राेजी अायसीसीने तातडीची बैठक अायाेजित केली आहे. याच बैठकीत बीसीसीअायचे अध्यक्ष साैरव गांगुली अाणि सचिव जय शहा सहभागी हाेणार अाहेत. यासाठी हे दाेघेही उद्या साेमवारी दुबईला रवाना हाेतील. यादरम्यान उपाध्यक्ष राजीव शुक्लाही असतील. बीसीसीअाय या बैठकीदरम्यान विश्वचषक अायाेजन निर्णयाबाबत अायसीसीकडे एक महिन्याचा कालावधी मागणार अाहेत. मात्र, सध्या काेराेनामुळे देशात गंभीर चित्र अाहे. अशा या स्पर्धेचे अायाेजन हे अडचणीचे ठरेल.

नुकसान भरपाई देण्याच्या घाेषणेचा बाेर्डाला विसर
बीसीसीअायने युवा खेळाडूंना काेराेना महामारी अाणि लाॅकडाऊनच्या काळात अार्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याची घाेषणा केली हाेती. मात्र, याच घाेषणेचा बीसीसीअायला पुरता विसर पडला. कारण, मुंबईतील बैठकीत यावर काेणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे अाता युवांसाठीची मदतीची ही घाेषणा हवेत विरल्याची टीका केली जात अाहे. खेळाडूंमध्येही याबाबत प्रचंड नाराजी अाहे.

गंभीर परिस्थिती दूर हाेईल, अायाेजन साेपे : गांगुली
सध्या भारतामध्ये काेराेनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली अाहे. मात्र, आगामी दाेन महिन्यांत या परिस्थितीमध्ये सकारात्मक असा बदल हाेईल. त्यामुळे विश्वचषक स्पर्धा अायाेजनाचा मार्ग अधिक सुकर हाेईल, असा विश्वास बीसीसीअायचे अध्यक्ष साैरव गांगुलीने व्यक्त केला.भारतामध्येे अाॅक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा हाेणार अाहे. मात्र, सध्या भारतामध्ये काेराेनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली अाहे. अशात आयसीसीने अाता विश्वचषकाच्या अायाेजनासाठी यूएईची पर्यायी निवड केली. अाता बीसीसीआय हा विश्वचषक भारतामध्येच अायाेजित करण्यावर अधिक भर देत अाहे.

अायपीएल लांबणीवर; सामन्यांचे वेळापत्रक अनिश्चित
काेराेनाचा माेठा फटका यंदाच्या १४ व्या सत्रातील आयपीएल अायाेजनाला बसला अाहे. २९ सामन्यांच्या अायाेजनानंतर काेराेनाबाधित खेळाडूंची संख्या वेगाने वाढली. त्यामुळे तातडीने बीसीसीआयने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अाता आयपीएलचे उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये अायाेजित करण्यावर सध्या बीसीसीआय विचार करत अाहे. यावरही अाता बैठकीत चर्चा झाली. मात्र, हे सामने यूएईमध्ये सप्टेंबर-अाॅक्टाेबरमध्ये हाेणार अाहेत. मात्र, याबाबत ठाेस असा निर्णय बैठकीत झाला अाहे.

यातूनच याचेही अायाेजन हे लांबणीवर पडले अाहे. या स्पर्धेच्या अायाेजनाला यूएईमध्ये हिरवी झेंडी मिळाली अाहे. मात्र, याचे वेळापत्रक अद्याप निश्चित नाही. त्यामुळेच याचे अायाेजन कधीपासून हाेणार हा पेच अद्यापही कायम अाहे. यूएईमधील आयपीएल सामन्यादरम्यान इंग्लंड अाणि बांगलादेश टीमचे खेळाडू हे मालिकांसाठी दाैऱ्यावर असणार अाहेत. त्यामुळे त्यांच्या सहभागाबाबतही प्रश्न निर्माण हाेणार अाहे. याशिवाय याचदरम्यान कॅरेबियन लीग हाेणार अाहे. ही लीग २८ अाॅगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत रंगणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...