आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह ट्विट:समीत ठक्करला 9 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा एकदा पोलिस कोठडी, सोमवारी नागपूर कोर्टाने दिला होता जामिन

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • समीत ठक्करवर 2 जुलैला दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या समीत ठक्करला मुंबईच्या स्थानिक न्यायालयाने 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. नागपूर पोलिसांनी 24 अक्टोबरला त्याला अटक केली होती. यानंतर सोमवारी नागपूरच्या कोर्टाने त्याला जामिन दिला होता. यानंतर आता मुंबई पोलिसांनी त्याला आपल्या कस्टडीमध्ये घेतेल. समीत ठक्करवर 2 जुलैला दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. पहिला नागपूर आणि दुसरा मुंबईच्या व्हीपी रोड पोलिस स्टेशनमध्ये होता.

सशर्त जामिन मंजूर
सोमवारी समीतला नागपूरच्या एम.व्ही.भराडेंच्या कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडी मंजूर होताच बचाव पक्षाचे वकील प्रकाश जयस्वाल यांनी जामीन अर्ज दाखल केला. पोलिसांनी समीतची चौकशी केलेली आहे असे बचाव पक्षाने आपल्या याचिकेत म्हटले होते. कोविडच्या काळात कथित आरोपीची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्याला तुरुंगात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही. म्हणूनच त्याला जामिन मिळायला हवा.

सरकारी वकीलांनी जामिनाचा विरोध केला आणि सांगितले की, हे प्रकरण संवेदनशील आहे. जामिन मिळाल्याने आरोपीच्या चौकशीवर प्रभाव होऊ शकतो. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर समीतला सशर्त जामिन मंजूर केला.

समीत ठक्करला काय आरोप
समीतवर आरोप आहे की, त्याने सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. 1 आणि 30 जूनला समीतने ठाकरे कुटुंबावर टीका केली होती.

कोर्टात हजर करण्यावरुन झाला होता वाद
समित ठक्करचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पोलिस काळ्या कपड्याने त्याचा चेहरा झाकून आणि बेड्या लावून कोर्टात हजर करण्यासाठी जात होती. कुटुंबाने आरोप लावला की, पोलिस समीतसोबत दहशतवाद्यांसारखा व्यवहार करत आहे.

समीतचा भाऊ ऋषी ठक्करने म्हटले, 'पोलिसांनी माझ्या भावाला कोर्टात हजर केले तेव्हा त्याचा चेहरा काळ्या कपड्याने झाकला होता आणि हाथ बांधले होते. पोलिसांद्वारे माझ्या भावाच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे. ते त्याच्यासोबत असा व्यवहार करत होते जसा दहशतवाद्यांसोबत केला जातो.'