आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांना 2 मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणीक वर्ष 12 जूनपासून सुरू होणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
कधीपासून सुट्टी?
परिपत्रकातील निर्देशानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी 11 जून पर्यंत असणार आहे. राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे 12 जूनपासून सुरू होणार आहे. मात्र, विदर्भातील उन्हाळा लक्षात घेता या भागातील नवे शैक्षणीक वर्ष 26 जूनपासून सुरू होईल.
परिक्षेचा निकाल कधी?
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल 30 एप्रिलपर्यंत लागणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळांची आणि महाविद्यालयांची असणार आहे.
शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या
शैक्षणिक वर्षातील एकूण सुट्ट्या या 76 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता शिक्षण अधिकाऱ्यांनी द्यावी, असं सुद्धा परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण संचालनालयाने हे परिपत्रक काढून विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांना आदेश दिले आहेत.
स्कूलबसचे शुल्क वाढले
येत्या शैक्षणिक वर्षात स्कूलबसच्या शुल्कात मोठी वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला आहे. स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे. मागील वर्षीही इंधन दरवाढीमुळे स्कूलबसच्या शुल्कात वाढ झाली होती. आता, पुन्हा एकदा नव्या शैक्षणिक वर्षात स्कूलबसचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.