आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चौकशी:शिवसेना आमदार प्रताप सरनाईक ईडी कार्यालयात दाखल, चौकशीला झाली सुरुवात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वीच ईडीच्या टीमने प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. यानंतर गुरुवारी ते ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. तसेच चौकशीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीच्या टीमने प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते.

टॉप्स ग्रुप(सिक्युरीटी) कंपनीच्या कथीत आर्थिक गैरव्यवहारांबाबत तपास करणाऱ्या ईडीने आमदार प्रताप सरनाईक यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावले. ईडीने सरनाईक यांचे घर, कार्यालयामध्ये ईडीने छापे मारले होते. यासोबतच त्यांचे पुत्र विहंग यांना विभागीय कार्यालयात आणून चौकशीही केली होती. दरम्यान यापूर्वी सरनाईकांना तीन वेळा समन्स बजावण्यात आला होता. मात्र ते परदेशातून आल्याने विलगीकरणात होते. यामुळे त्यांना चौकशीसाठी वेळ मागितलेला होता.

प्रताप सरनाईकांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा
ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक यांच्या घरासह 10 ठिकाणी छापा टाकला होता. त्यानंतर ईडीने चौकशीबाबतसाठी सरनाईक यांना वारंवार नोटीस पाठवली होती. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. अखेर न्यायालयाने प्रताप सरनाईक यांची बाजू घेत त्यांना दिलासा दिला होता. सध्या ईडीने कोणतीही कठोर कारवाई करू नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे प्रताप सरनाईक यांना दिलासा मिळाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser