आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra State Assembly Budget Session 2022 | Cm Uddhav Thackeray Feedback After Budget Session | This Budget Shows The Future Direction Of The State; Disaster Is The Next Step Towards Development Chief Minister Uddhav Thackeray

महाअर्थसंकल्प 2022:राज्याची आगामी दिशा दाखवणारा हा अर्थसंकल्प; आपत्ती झेलत हे विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज उपमुख्यमंत्र्यांनी राज्याची आगामी दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे. गेली दोन वर्षे आपत्ती झेलत हे विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे, जे-जे शक्य आहे ते आम्ही करणार आहोत, मी ठामपणे सांगू इच्छितो सर्वांच्या साक्षीने जनतेचा विकास करणारा हा अर्थसंकल्प आहे, मला खात्री आहे जनता स्वागत करेल, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प जनतेच्या हिताचे असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज विधानसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आल्याचे अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करताना, आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद करण्यात आली.

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री-रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी सभागृहात केली. अकोला आणि बीड येथे स्त्री-रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...