आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय इनिंगची चर्चा:तेजस ठाकरे राजकाणात मारणार एंट्री? वाढदिवसानिमित्त मिलिंद नार्वेकरांच्या जाहिरातीने राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • . नार्वेकर यांनी सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी केली आहे

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा शनिवारी वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देताना वेगळ्या प्रकारची जाहिरात दिल्याने तेजस यांची राजकारणात एंट्री होणार का, याबाबत दिवसभर एकच चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती.

नार्वेकर यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात दिलेल्या जाहिरातीत तेजस ठाकरे यांची तुलना व्हिव्हियन रिचर्ड्््स यांच्याशी केली आहे. सध्या युवा सेनेच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे तेजस यांच्याकडे हे पद देण्यात येते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एक घाव दोन तुकडे
नार्वेकरांनी तेजस यांना शुभेच्छा देताना त्यांची तुलना क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्््स यांच्यासोबत केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्ड्््स तेजस उद्धव ठाकरे आहेत. त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असे या जाहिरातीमध्ये म्हटले आहे. यामधून रिचर्ड्््स हे जसे स्फोटक, आक्रमक खेळी करत होते, तसेच तेजस ठाकरे आहेत, असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या एका जाहिरातीमध्ये “एक घाव दोन तुकडे’ असे लिहून तेजस यांच्या आक्रमकपणाची ओळख करून दिल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील तेजस ठाकरे यांना वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना तरुणांनी राजकारणात आल्यास चांगले होईल, असे वक्तव्य केले आहे.

बाळासाहेब म्हणाले होते, तेजस माझ्यासारखा
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका सभेत तेजस याच्याबाबत बोलताना सांगितले होते की, तेजस हा माझ्यासारखा आहे. त्याच्या स्वभावात आक्रमकपणा आहे. त्याची तोडफोड सेना आहे. दरम्यान, तेजस ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत अतिशय मोजक्याच सभांना उपस्थित होते. त्या वेळीही तेजस राजकारणात येणार, अशा चर्चा त्या वेळी मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या.

तेजसला जीवसृष्टीची आवड : भुजबळ
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, तेजस ठाकरेचा आवडीचा विषय अवघड आहे. तो जीवसृष्टी सोडून तो राजकारणात येईल, असे वाटत नाही, पण त्याबाबत तेजस आणि उद्धव ठाकरे हेच सांगू शकतील. पण तरुणांनी राजकारणात येणं हे चांगलं असून त्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बातम्या आणखी आहेत...