आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई उपनगर हा सोमवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण परिसर होता. येथे पारा 6.4 अंशांनी वाढल्याने कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस होता. मात्र, अलिबागमध्ये सर्वाधिक 7.5 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली. असे असतानाही येथील कमाल तापमान केवळ 38 अंश सेल्सिअस राहिले.
छत्रपती संभाजी नगरला तापमानात घट
छत्रपती संभाजी नगरच्या कमाल तापमानात 0.7 अंश सेल्सिअस आणि जळगावच्या कमाल तापमानात 0.1 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली. सोमवारी अमरावतीच्या कमाल तापमानात 1.8 अंश सेल्सिअस, अकोल्यात 0.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूरमध्ये 0.3 अंश सेल्सिअसची किंचित वाढ नोंदवण्यात आली.
मुंबईच्या तापमानात 6 अंश सेल्सिअसने वाढ
प्रादेशिक हवामान केंद्राचे (मुंबई) म्हणणे आहे की, जोरदार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सोमवारी मुंबईचे तापमान 39.3 अंश सेल्सिअस होते. याशिवाय सागरी वारे वाहण्यास उशीर झाल्याने मुंबईतील तापमानात वाढ झाली. सोमवारी मुंबईत उष्णता वाढली असली तरी मंगळवारी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कारण आज (मंगळवारी) मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.
मुंबई उपनगराचे तापमान 39.3 अंश
विशेष म्हणजे सोमवारी मुंबई उपनगराचे तापमान 39.3 अंश सेल्सिअस तर शहराचे तापमान 37 अंश सेल्सिअस होते. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून तारा वाढत आहे. त्यामुळे उष्णता सातत्याने वाढत आहे. सोमवारी मुंबई उपनगरात 6.4 अंश सेल्सिअस आणि शहराच्या तापमानात 5.7 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली गेली.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कमाल आणि किमान तापमान
( ( अंश सेल्सिअसमध्ये)
शहर | कमाल तापमान, | किमान तापमान |
छत्रपती संभाजीनगर | 33.7 | 16.7 |
नाशिक | 25.9 | 17.6 |
सोलापूर | 36.8 | 22.2 |
जळगाव | 35.4 | 18.7 |
अकोला | 35.7 | 21.1 |
अमरावती | 36.2 | 19.3 |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.