आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक आज दुपारी साडे तीन वाजता मंत्रालयात पार पडली. दरम्यान या बैठकीत महत्वांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील 500 चौ.फूटअथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या "निवासी" हा वापरकर्ता प्रवर्ग असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करामधून सवलत दिली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासह अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतले आहेत.
आज 12 जानेवारी 2022 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात
छाबय्या विहंग गार्डन या इमारतीस लावलेला दंड व त्या दंडावरील संपूर्ण व्याज माफ करून भोगवटा प्रमाणपत्र देण्यास मान्यता (नगर विकास विभाग)
पायाभूत सुविधांची कामे वेगाने होण्यासाठी आता दिवसाप्रमाणे रात्री देखील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक करण्यास मान्यता (महसूल विभाग )
गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या व मृतभाटकाच्या दरात सुधारणा. (महसूल विभाग )
मौजे आंबिवली येथील जमीन "शांताबाई केरकर मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टला "मॅटर्निटी होम व डिस्पेन्सरी" साठी भुईभाडयाने प्रदान करण्यास मान्यता. (महसूल विभाग )
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.