आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणमध्ये 9 वर्षीय मुलीचा अत्याचारानंतर खून:अल्पवयीन मुलाचे कृत्य, ताब्यात घेतल्यानंतर म्हणाला - मला सूड घ्यायचा होता!

ठाणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कल्याण पश्चिम रेल्वेस्थानकाजवळील उच्चभ्रु वस्तीत इमारतीच्या आवारात एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.

दोघेही फिरस्ते

कल्याण पश्चिम बस आगाराजवळ न्यू मोनिका उच्चभ्रूंची वस्ती असलेले गृहसंकुल आहे. या इमारतीच्या आवारात मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. सांगण्यात येत आहे की, 15 वर्षीय तरुणाने तिचा गळा चिरुन खून केला.

अन् ती दिसली रक्ताच्या थारोळ्यात

रस्त्यावरुन येजा करणाऱ्या पादचाऱ्यांना न्यू मोनिका सोसायटीच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात एका मुलीचा मृतदेह पडला असल्याचे सकाळी दिसले. ही माहिती पादचाऱ्यांनी सोसायटी सदस्यांना दिली. त्यानंतर ही माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविला.

सीसीटीव्ही कॅमऱ्यांद्वारे शोध

पोलिस उपायुक्त सचीन गुंजाळ यांनी तातडीने आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या. या गृहसंकुलाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. फुटेजमध्ये एक तरुण मुलीला सोसायटीच्या आवारात घेऊन येताना दिसली. या फुटेजवरुन मुलाचा शोध घेतला जात आहे.

संशयिताला अटक

पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याला महात्मा फुले पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे विचारपूस केली. त्याने आपण मुलीचा खून केला अशी कबुली दिली आहे.

हे धक्कादायक कारण

ज्या मुलीचा खून झाला, तिच्या वडिलांनी काही दिवसापूर्वी आपणास मारहाण केली होती. या रागातून सूड घेण्यासाठी मुलीचा धारदार पातेने गळा चिरुन खून केला अशी कबुली मुलाने दिली. त्यामुळे सुडातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...