आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरण:केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नाही, यामुळेच बंद करावी लागत आहेत लसीकरण केंद्रे; राज्य सरकारचा आरोप

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दरम्यान केंद्रसरकारने राज्यात निर्माण झालेली लस टंचाई लक्षात घेता तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांची २० लाख संख्या असून पहिला डोस घेणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दुसऱ्या डोसची लस मिळेल परंतु पहिला डोस घेणाऱ्यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत.

बुधवारी ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीचा साठा आहे. तो संपत नाहीय. खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापनाला त्या लसीची मुदत संपेल ही भीती वाटते आहे म्हणून त्यांनी तो साठा सरकारला तात्काळ द्यावा जेणेकरून निर्माण झालेली लसटंचाई कमी होईल. जेव्हा त्यांना आवश्यक आहे त्यावेळी टप्प्याटप्याने ती लस परत करण्यात येईल असा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. दरम्यान केंद्रसरकारने राज्यात निर्माण झालेली लस टंचाई लक्षात घेता तात्काळ लसीचा पुरवठा करावा अशी मागणीही करण्यात आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...