आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शालेय शिक्षण:YouTube आणि JioTv वर भरणार शाळा, चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु करणारं महाराष्ट्र एकमेव राज्य

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वीच्या मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी 4 नवीन YouTube चॅनल सुरु केले आहेत. सोबतच आता इयत्ता 3 री ते इयत्ता 12 वी साठी जिओ टी.व्ही वर एकूण 12नवीन चॅनल्स सुरु करण्यात आले असल्याची माहिती राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने 4 माध्यमांमध्ये शैक्षणिक Channel सुरु केले आहेत. स्वतः वर्ष गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. सध्या मराठी आणि उर्दूमध्ये या दोन भाषांमध्ये या चॅनल्सच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. लवकरच इंग्रजी आणि हिंदीमध्येदेखील अशा प्रकारचे चॅनल्स येणार आहेत.  

वर्षा गायकवाड यांनी याविषयी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, 'इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. ' पुढे त्यांनी लिहिले की, इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्ही वर एकूण 12 चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे एकमेव असे राज्य आहे ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.'

यापूर्वी वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचं वेळापत्रक ट्विट केलं होतं. कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य सरकारने 15 जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरूवात केली. मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. शिक्षण विभागाने पूर्व प्राथमिक ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. या सूचनांप्रमाणे यापुढे केजी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन  वर्ग सुरू होणार आहेत. केजीच्या विद्यार्थांचे दररोज 30 मिनीटे वर्ग घेण्यात येतील. यामध्ये पालकांशी संवाद, मार्गदर्शन करण्यात येईल.