आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Maharashtra Tops The Country, Full Dose 50 Lakh; The State Is Also Number One In The Number Of Patients, With A Total Of 26 Lakh Patients

लसीकरण:महाराष्ट्र देशात अव्वल, डोस पूर्ण 50 लाख; रुग्णसंख्येतही राज्य नंबर वन, एकूण रुग्ण 26 लाख

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • १० लाख डोस मुंबईत दिले, राज्यात सर्वाधिक, ३२,९३८ डोस सिंधुदुर्ग येथे, राज्यात सर्वात कमी

कोविड-१९ लसीकरणात देशात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यात बुधवार अखेरपर्यंत एकूण ४३ लाख ४२,६४६ जणांचे काेरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५० लाख ५१,३३९ डोस देण्यात आले आहेत. ५० लाख डोसचा आकडा गाठणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य आहे. राज्यात ६ लाख ७२,१२८ जणांना दुसरा लसीचा डोस देण्यात आला आहे. बुधवारी २ लाख ७०,९३७ डोस देण्यात आले.

-१० लाख डोस मुंबईत दिले, राज्यात सर्वाधिक
-३२,९३८ डोस सिंधुदुर्ग येथे, राज्यात सर्वात कमी

लाभार्थी पहिला डोस दुसरा डोस
आरोग्यकर्मी 940822 452581
फ्रंटलाइन वर्कर 714078 214792
४५ वर्षांपुढील 500030 --
६० वर्षांपुढील 2229036 --

टॉप - 5 : जिल्हा पातळीवरील सक्रिय रुग्णांतील वाढ अशी
जिल्हा 11 फेब्रु. 23 मार्च % बदल
नांदेड 300 10106 3268
औरंगाबाद 553 15380 2681
परभणी 98 2274 2220
धुळे 137 3045 2122
हिंगोली 67 1391 1976

  • लसीकरणात महाराष्ट्राने राजस्थानला मागे टाकले आहे. तेथे २४ मार्चपर्यंत ४३ लाख २७,८७४ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तेथे एकूण ४९ लाख ९४,५७४ डोस देण्यात आलेले आहेत.

विदर्भात ७० मृत्यू, ६८११ नवे रुग्ण
विदर्भात गुरुवारी कोरोनामुळे ७० जणांचा मृत्यू, तर ६८११ नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांत पूर्व विदर्भातील ४९ जणांपैकी नागपूरच्या ४९ तर भंडारा येथील दाेघांचा समावेश अाहे. पश्चिम विदर्भात एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मराठवाड्यात ४४ मृत्यू, २९६६ रुग्ण
गुरुवारी मराठवाड्यात ४,५६१ नवे रुग्ण, तर ४४ बाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबादेत १९९५ रुग्ण, तर १८ जणांचा मृत्यू झाला. ४५०, परभणी ३७३, हिंगोली ५६, नांदेड १०५३, उस्मानाबाद १७४, लातूर ५२५, बीडमध्ये ३३५ नवे रुग्ण सापडले.

गुरुवारी ३५,९५२ रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात गुरुवारी विक्रमी ३५,९५२ नवे रुग्ण वाढले. दुसरीकडे दिवसभरात २०,४४४ रुग्ण बरे हाेऊन घरीही परतले. १११ नव्या मृत्यूंसह एकूण मृतांचा आकडा ५३,७९५ वर पोहोचला आहे. एकूण काेरोनाबाधित रुग्णांची संख्या २६ लाख ८३३ वर पोहोचली आहे. त्यापैकी २२ लाख ८३,०३७ जणांनी काेरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.७८ टक्क्यांवर आले आहे. मृत्यूदर २.०७% इतका आहे. सक्रिय रुग्णांचा अाकडा २ लाख ६२,६८५ वर पोहोचला.

बातम्या आणखी आहेत...