आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज दिवसभरात राज्यभरात 841 रुग्णांची भर पडली. यासोबत राज्यतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 हजार 525 पोहोचला आहे. आज राज्यभरात कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 350 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील 165 रुग्ण मुंबईतील आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण बरे होण्याची संख्या आहे. यासोबतच राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 2819 वर गेला
मुंबई : बीडीडी चाळ सात दिवसांसाठी बंद
मुंबईतील सर्वाधिक संसर्गग्रस्त वरळी भागातील बीडीडी चाळ इमारती पुढील सात दिवस बंद ठेवण्यात आली आहे. येथील इमारतींमध्ये आतापर्यंत 40 कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. संपूर्ण वरळीमध्ये 817 संक्रमित आहेत. वरळी आणि एनएम जोशी मार्ग मुंबईतील सर्वाधिक कोरोना प्रभावित भाग आहे. बीडीडी चाळीतील लोक लॉकडाउनमध्येही रस्त्यावर फिरत होते.
रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्यात येत आहे
कोरोनाच्या गंभीर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभाग विविध रुग्णालयांमधील बेडची संख्या 3 हजार वरून 4 हजार 750 पर्यंत करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. त्याअंतर्गत केईएम, नायर, सेंट जॉर्ज आणि सेव्हन हिल्स रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे.
जेजे मार्ग पोलिस स्टेशनमध्ये 12 पोलिसांना कोरोनाची लागण
मुंबईतील झोन 1 स्थित जेजे मार्ग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 6 पोलिस अधिकारी आणि 6 शिपायांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय 6 अधिकारी आणि 48 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई पोलिसच्या 211 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. ताज्या माहितीनुसार, डीसीपी रँक अधिकारी देखील संसर्गाचे बळी ठरले आहे.
नाशकात कोरोनाबाधित गर्भवती महिलेचा मृत्यू
मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरातही कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 3 दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. शहरातील बजरंग वाडी येथुल आलेल्या या गर्भवती महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं आज सकाळी स्पष्ट झालं असल्याने या महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे यांनी सांगितले आहे.
सीन्नर कनेक्शन? : सिन्नरमध्येही कोरोनाचे रुग्ण असून ही महिला सुद्धा सिन्नर वरून नाशिकला आली होती. त्यामुळे सिन्नर मधूनच ही गर्भवती महिला कोरोना बाधित असावी असा अंदाज लावला जात आहे. सिन्नरला सध्या 5 कोरोना बाधित रुग्ण आहे.
हिंगोलीत आणखी 14 जण पॉझीटिव्ह, सर्व जण राखीव दलाचे जवान, एकूण रुग्ण संख्या 89
हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाने पाठविलेल्या स्वॅब नमुन्यांपैकी आणखी 14 जवानांचे स्वॅब नमूने पॉझिटिव्ह आले आहे. या बाबतचा अहवाल मंगळवारी (5 एप्रिल) प्राप्त झाला आहे. आता हिंगोलीतील रूग्णाची संख्या 89 झाली आहे.
अकोल्यात आज 11 नव्या रुग्णांची भर
अकोल्यातही आज 11 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यासोबत जिल्ह्यातील रुग्णसंख्या 75 वर पोहोचली आहे.
रायगड : दापोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मूळ दापोली तालुक्यातील माटवण नवानगर येथील एका 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्याने दापोलीत एकच खळबळ उडाली आहे. सदर महिलेला पोटाचा त्रास होत असल्याने त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबई येथे अधिक उपचारासाठी गेल्या होत्या तेथे त्यांनी सायन रुग्णालय व केईएम रुग्णालय येथे व एका खाजगी दवाखान्यात उपचार घेतले त्यांना तीन दिवसापूर्वी रुग्णवाहिकेतून दापोलीत आणण्यात आले. दापोलीत आणल्या नंतर त्यांचा स्वॅब अधिक तपासणीकरिता पाठवण्यात आला. त्यांना तीन दिवस दापोली येथे आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. आज त्यांचा स्वॅब प्राप्त झाला असता त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना आता रत्नागिरी येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
अमरावतीत माजी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह
अमरावतीत एका माजी मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सोमवारी मध्यरात्री एक वाजता या मंत्र्याचा अहवाल प्राप्त झाला. यासोबत अमरावतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद : आज 24 रुग्ण वाढले, 11 जणांचा मृत्यू
औरंगाबादमध्ये आज 24 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासोबत शहरातील रुग्णसंख्या 324 झाली आहे. तसेच आज शहरात कोरोनाचा 11 वा बळी गेला. किले अर्कमधील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चार दिवसांपासून ही व्यक्ती दवाखान्यात भरती होती अशी माहिती या दवाखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण सूर्यवंशी यांनी दिली आहे.
राज्यात सोमवारी 771 नवे कोरोनाग्रस्त आढळले तर 35 जणांचा मृत्यू झाला
राज्यात सोमवारी 771 नवे कोरोनाग्रस्त आढळले तर 35 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णसंख्या 14,541 झाली असून बळींचा आकडा 583 वर गेला. रविवारी कोरोनाग्रस्तांची संख्या 12,974 होती. यात दीड हजाराच्या आसपास वाढ झालेली दिसत असली तरी 796 रुग्ण हे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांतील आहेत. गेल्या 4-5 दिवसांतील त्यांची अपलोड झालेली आकडेवारी असल्याने आकडा 14,541 गेल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी 350 कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेले. राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा 2465 वर गेला आहे.
रुग्णांचा तपशील : मुंबई मनपा ९३१०, ठाणे ६४, ठाणे मनपा- ५१४, नवी मुंबई २५४, कल्याण डोंबिवली २२८, उल्हासनगर ४, भिवंडी २२, मीरा भाईंदर १५२, पालघ ४६, वसई विरार १५८, रायगड ४१, पनवेल ६४, नाशिक मंडळ ५३१, पुणे मंडळ २२२६, कोल्हापूर मंडळ ६०, औरंगाबाद मंडळ ३७५, लातूर मंडळ ५४, अकोला मंडळ २२९, नागपूर १८०, इतर राज्ये २९.
पुण्यात आणखी सहा जणांचा मृत्यू, 63 नवीन रुग्ण दाखल
पुणे शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्याची संख्या दररोज वाढत असून, सोमवारी ६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे परिसरात आणखीन ६३ नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. भवानी पेठेतील ५२ वर्षीय महिलेचा पहाटे सिम्बॉयसिस रुग्णालयात उपचादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २३ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले होते. लोहियानगर येथील ६५ वर्षीय महिलेला १ मे रोजी ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, सोमवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. तर औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीचा सकाळी मृत्यू झाला. ते पाटील इस्टेट, शिवाजीनगर येथे राहत होते, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तसेच हडपसर येथील सह्याद्री रुग्णालयात १ मे रोजी रामटेकडी परिसरातील ५८ वर्षीय व्यक्तीला अत्यावस्थेत रुग्णालयात घेऊन आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले असता, पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. वरील सर्व मृत व्यक्तीची अन्य त्रास होता, असेही आरोग्य विभागाने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.