आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र कोरोना:राज्यात आज 2 हजार 91 रुग्णांची नोंद, तर 97 मृत्यू; एकूण रुग्णसंख्या 54 हजार 758 वर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी 1 हजार 2 रुग्ण एकट्या मुंबईतील आहे

महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 91 नव्या रुग्णांची वाढ झाली. यातील 1 हजार 2 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. यासोबत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 54 हजार 758 वर पोहचला आहे. कोरोनामुळे आज राज्यभरात 97 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 32 हजार 974 झाला आहे. आज 1168 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 16,954 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

केईएम रुग्णालयातील कोरोना वॉर्डात तैनात कर्मचाऱ्याचा मृत्यू 

मुंबईतील केईएम रुग्णालयातील कोरोना वॉर्डात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा रविवारी मृत्यू झाला. यानंतर मंगळवारी रुग्णालयाबाहेर आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांनी गोंधळ घातला. यामध्ये अनेक डॉक्टरांचा देखील सहभाग होता. 4 दिवसांपासून आजारी असलेल्या या कर्मचाऱ्याने सुटीसाठी अनेकवेळा अर्ज केला मात्र त्याला मंजुरी दिली नसल्याचा या कर्मचाऱ्यांनी आरोप केला आहे. मृत्यूनंतर कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी घेण्यात आली असून अहवालाची प्रतिक्षा आहे. निषेध नोंदवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी मृताच्या कुटुंबाला नोकरी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली. रुग्णालयातील शवगृहाचा कर्मचाऱ्याचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. रुग्णालयातील शवगृह भरले आहे यामुळे मृतदेहाला पहिल्या मजल्याच्या गॅलरीत ठेवले जात असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...