आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समर्पित आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर:ओबीसी, व्हीजे-एनटी आरक्षणप्रकरणी संघटना, नागरिकांना मते मांडण्याची संधी; 21 मे ते 28 मे दौरा

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी, व्हिजे-एनटी यांच्या आरक्षणासाठी स्थापन केलेल्या समर्पित आयोगाचा राज्यभर विभागस्तरावर भेटींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. मे महिन्यात आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर असून या दौऱ्यात नागरिकांची व या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांची निवेदने स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात अगोदर नाव नोंदणी करावी लागणार आहे.

आयोगाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शहरी क्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हिजे-एनटी यांना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोगाची स्थापना केली आहे. आयोगाने राज्यातील या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना व नागरिकांची मते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून 21 मे ते 28 मे या कालावधीत राज्यातील विविध विभागात भेटीचा कार्यक्रम घोषित केला आहे. घोषित दौऱ्यानुसार आयोग रविवारी 22 मे, 2022 रोजी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत भेट देणार आहे.

अगोदरच करावी लागणार नाव नोंदणी
या क्षेत्रात काम करणाऱ्या नाशिक विभागांतर्गत असलेल्या नाशिक, अहमदनगर, धुळे,
जळगांव, नंदूरबार या जिल्ह्यातील ज्या सामाजिक संघटना व नागरिकांना आपली मते व निवेदने आयोगासमोर सादर करावयाची आहेत, त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथे आयोगाच्या भेटीअगोदर नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.

असा असेल राज्यभर भेटींचा कार्यक्रम:

  • नाशिक विभाग: रविवार 22 मे 2022 सायंकाळी 5.30 ते 7.30 विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक
  • पुणे विभाग : शनिवार, 21 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
  • औरंगाबाद विभाग: रविवार, 22 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद
  • कोकण विभाग : बुधवार, 25 मे, 2022 दुपारी 2.30 ते 4.30 विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन
  • अमरावती विभाग : शनिवार, 28 मे, 2022 सकाळी 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती
  • नागपूर विभाग : शनिवार 28 मे, 2022 सायंकाळी 4.30 ते 6.30 विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर
बातम्या आणखी आहेत...