आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र अनलॉक-1:शाळा, कॉलेज, मेट्रो, हॉटेल्स, सलून बंदच; धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारची संमती नाही

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मिशन बिगीन अगेन’ या ठाकरे सरकारच्या अभियानाचा तिसरा टप्पा सुरु

‘मिशन बिगीन अगेन’ या ठाकरे सरकारच्या अभियानाचा तिसरा टप्पा सोमवारपासून (८ जून) प्रारंभ हाेत आहे. लाॅकडाऊनमुळे ७३ दिवस ठप्प झालेले राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येणार आहे. २४ मार्चपासून राज्यात लाॅकडाऊन, तर ३ जूनपासून अनलाॅक सुरू झाले.

1. खासगी कार्यालये :

१०% कर्मचाऱ्यांसह खासगी कार्यालये स. ९ ते ५ उघडतील. एमएमआरए क्षेत्र, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती व नागपूर मनपा हद्दीत सरकारी कार्यालये १५% मनुष्यबळांमध्ये उघडतील.

2. बस आणि एसटी सेवा

आजपासून जिल्ह्यांतर्गत बस आणि एसटी सेवेचा प्रारंभ होत आहे. बस क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. कंटेनमेंट झोन वगळता टप्पा १ व २ मध्ये सवलती दिल्या होत्या. त्या तिसऱ्या टप्प्यात कायम राहतील.

3. धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारची संमती नाही

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वेसेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठी सभागृहे खुली करण्यास संमती नाही. तसेच केशकर्तनालये, सलून, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स सेवा बंद राहणार आहेत. राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने अद्याप संमती दिलेली नाही, अशी माहिती विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...