आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्पावर अजित पवारांचे टीकास्त्र:म्हणाले- यंदाचा अर्थसंकल्पही 'अर्थहीन', दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन फसल्यानंतर यंदा 60 लाख नोकऱ्यांचे नवे गाजर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाला कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली, असे टीकास्त्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सोडले आहे. तसेच, 'केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटून प्रयत्न करावेत', असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.

यंदाचा अर्थसंकल्पही 'अर्थहीन' -
यापूर्वीच्या अर्थसंकल्पांप्रमाणे यंदाचा अर्थसंकल्पही 'अर्थहीन' आहे. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसल्यानंतर यंदा 60 लाख नोकऱ्यांचे नवे गाजर दाखवण्यात आले आहे. एलआयसीच्या आयपीओची घोषणा ही नफ्यातील शासकीय कंपनीच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. हा अर्थसंकल्प पुढच्या 25 वर्षांच्या विकासाची ब्ल्यूप्रिन्ट असल्याचा दावा निरर्थक असून निवडणुका असलेल्या पाच राज्यांमधल्या जनतेची मनधरणी करण्याचा अयशस्वी प्रयत्न अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, असेही अजित पवार म्हणाले.

संरक्षणक्षेत्राला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गेल्या आठ वर्षात या दिशेने केंद्र सरकारने काय केले याच उत्तर आता तरी द्यावे तसेच ‘मेक इन् इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील घोषणाही हवेत विरुन जातील, असे दिसते, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आत्मनिर्भर, अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प - फडणवीस

देवेंद्र फडणवीन म्हणाले की, 'केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प समजातील सर्व घटकांना न्याय देणारा आहे. हा अर्थसंकल्प देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बलशली भारताचे प्रतिक आहे. असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.

यासोबतच सोशल मीडियावर फडणवीस म्हणाले की, 'भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारामन यांचे खूप खूप आभार!', असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...