आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाची भेट:मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडातील महत्त्वाचे नेते राज्यपाल कोश्यारींच्या भेटीला, विधान परिषदेतील 12 आमदार नियुक्तीच्या प्रश्नावर होणार चर्चा

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी महाविकास आघाडीचे नेते देखील राज्यपालांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे.

विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली जात आहे. त्यामुळे, या भेटीतून तरी तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे राजभवनावर दाखल झाले आहेत.

गेल्या 8 महिन्यांपासून या आमदारांच्या नियुक्त्यांचे घोंगडे भिजत पडले आहे. याबाबत पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे या मुद्द्याबाबत विचारणा केली होती. त्याच वेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार आज ही भेट घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...